S M L

अनधिकृत घरं नियमित मागणीसाठी ठाणे ते आझाद मैदान लाँगमार्च

18 ऑक्टोबरठाणे शहरातील अनधिकृत घरं नियमित करावीत या मागणीसाठी आज घरमालकांनी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता.गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ठाण्याच्या तीनहात नाका ते आझाद मैदानपर्यंत हा लाँगमार्च काढण्यात आला होता. मात्र हा मोर्चा मुलुंडच्या मोरया तलावाजवळ अडवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. उल्हासनगरच्या धर्तीवर ठाण्यातली अनधिकृत घरंही नियमित करावीत ही घरमालकांची मुख्य मागणी आहे. सुमारे 15 हजार नागरिक यात सहभागी झाले होते. या मोर्चामुळे विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत होते आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2011 09:12 AM IST

अनधिकृत घरं नियमित मागणीसाठी ठाणे ते आझाद मैदान लाँगमार्च

18 ऑक्टोबर

ठाणे शहरातील अनधिकृत घरं नियमित करावीत या मागणीसाठी आज घरमालकांनी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता.गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ठाण्याच्या तीनहात नाका ते आझाद मैदानपर्यंत हा लाँगमार्च काढण्यात आला होता. मात्र हा मोर्चा मुलुंडच्या मोरया तलावाजवळ अडवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. उल्हासनगरच्या धर्तीवर ठाण्यातली अनधिकृत घरंही नियमित करावीत ही घरमालकांची मुख्य मागणी आहे. सुमारे 15 हजार नागरिक यात सहभागी झाले होते. या मोर्चामुळे विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2011 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close