S M L

एफ वनच्या थरारासाठी बुद्धा इंटरनॅशनल सर्किट सज्ज

18 ऑक्टोबरभारतात होणार्‍या पहिल्या वहिल्या इंडियन ग्राँप्रिसाठी नोयडातीलं बुद्ध इंटरनॅशनल सर्किट सज्ज झालं आहे. आज या एफ वन ट्रॅकचं उद्घाटन करण्यात आलं आहे. हा ट्रॅक जवळपास पाच किलोमीटर असून यात 16 वळण असणार आहेत. यात रेस एकूण 308 किमीची होणार आहे. रेससाठी मोटार गाड्यांचा सर्वाधिक वेग हा 320 किमी प्रति तास इतका असणार आहे. येत्या 30 ऑक्टोबरपासून एफ वनचा थरार अनुभवयाची संधी भारतीय चाहत्यांना पहिल्यांदाच मिळणार आहे. 2007 मध्ये या सर्किटच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि तेव्हाचे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी या प्रोजेक्टला 'ड्रीम प्रोजेक्ट' असं म्हटलं होतं. खरंतर 2009 मध्ये इथं रेस होणार होती. पण अपुर्‍या बांधकामामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर ही ग्राँप्री होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2011 10:43 AM IST

एफ वनच्या थरारासाठी बुद्धा इंटरनॅशनल सर्किट सज्ज

18 ऑक्टोबर

भारतात होणार्‍या पहिल्या वहिल्या इंडियन ग्राँप्रिसाठी नोयडातीलं बुद्ध इंटरनॅशनल सर्किट सज्ज झालं आहे. आज या एफ वन ट्रॅकचं उद्घाटन करण्यात आलं आहे. हा ट्रॅक जवळपास पाच किलोमीटर असून यात 16 वळण असणार आहेत. यात रेस एकूण 308 किमीची होणार आहे. रेससाठी मोटार गाड्यांचा सर्वाधिक वेग हा 320 किमी प्रति तास इतका असणार आहे. येत्या 30 ऑक्टोबरपासून एफ वनचा थरार अनुभवयाची संधी भारतीय चाहत्यांना पहिल्यांदाच मिळणार आहे. 2007 मध्ये या सर्किटच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि तेव्हाचे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी या प्रोजेक्टला 'ड्रीम प्रोजेक्ट' असं म्हटलं होतं. खरंतर 2009 मध्ये इथं रेस होणार होती. पण अपुर्‍या बांधकामामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर ही ग्राँप्री होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2011 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close