S M L

पुणे महापालिकेचा सुस्त कारभार ; 17 कोटींची थकबाकी !

19 ऑक्टोबरपुणे महापालिकेनं भाडेकरारने दिलेल्या जागांची कोट्यवधींची थकबाकी वसूलच केलेली नाही. ही रक्कम 17 कोटी आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळाली. महापालिकेनं मोकळ्या जागा, व्यापारी गाळे आणि सदनिका भाड्याने दिल्या आहेत. पण त्यांचं भाडंच वसूल केलेलं नाही. ही रक्कम 17 कोटींच्या घरात गेली. दुसरीकडे हा करार अनेक वर्षांपुर्वीचा आहे. हे करार दरवर्षी रिन्यू करणं अपेक्षित होतं. पण ते करण्यात आलेलं नाही. सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली. आता एक टीम बनवण्यात येईल. त्यांच्याकडे या रकमेच्या वसुलीची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2011 12:10 PM IST

पुणे महापालिकेचा सुस्त कारभार ; 17 कोटींची थकबाकी !

19 ऑक्टोबर

पुणे महापालिकेनं भाडेकरारने दिलेल्या जागांची कोट्यवधींची थकबाकी वसूलच केलेली नाही. ही रक्कम 17 कोटी आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळाली. महापालिकेनं मोकळ्या जागा, व्यापारी गाळे आणि सदनिका भाड्याने दिल्या आहेत. पण त्यांचं भाडंच वसूल केलेलं नाही. ही रक्कम 17 कोटींच्या घरात गेली. दुसरीकडे हा करार अनेक वर्षांपुर्वीचा आहे. हे करार दरवर्षी रिन्यू करणं अपेक्षित होतं. पण ते करण्यात आलेलं नाही. सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली. आता एक टीम बनवण्यात येईल. त्यांच्याकडे या रकमेच्या वसुलीची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2011 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close