S M L

नाशिक एमआयडीसीत नगरसेवकांने लाटला भूखंड !

दीप्ती राऊत, नाशिक18 ऑक्टोबरनाशिकमध्ये एमआयडीसीच्या जागेवर एकीकडे उद्योजकांचे बंगले उभे राहिले आहेत तर दुसरीकडे एमआयडीसीसाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांच्या हातात मात्र वाटाण्याच्या अक्षदा पडल्या आहेत. या स्थानिक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचं नेतृत्व करणार्‍या शिवसेनेच्या नगरसेवकाने स्वत:च भूखंड लाटल्याची तक्रार आहे.शहराच्या औद्योगिक विकासासाठी अंबड गावातल्या शेतकर्‍यांनी 433 एकर जमीन दिली. या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना 100 चौरस मीटरचा भूखंड देण्याची तरतूद होती. प्रत्यक्षात मात्र गेल्या 30 वर्षात 135 पैकी फक्त 30-35 जणांना हे भूखंड वाटण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्त साहेबराव दातार म्हणतात, मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तेव्हा कळलं भूखंडांचे वाटप करण्यात येतंय. त्यातून लक्षात आलं स्थानिक नगरसेवक तानाजी फडोळ यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड लाटला.या प्रकरणी सरकार दरबारी न्याय मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्तांनी भिस्त होती स्थानिक नगरसेवकांवर. पण स्थानिक नेत्यांनी लोकांना बाजुला सारलं आणि स्वत:च भूखंड लाटले. शिवसेनेचे नगरसेवक तानाजी फडोळ यांचा हा भूखंड. त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे भूखंड लाटल्याच्या तक्रारी आहेत. तानाजी फडोळ यांनी पणजोबा रामा फडोळ यांच्या वारशाचा भूखंड मिळवला आहे. खरं तर शासनाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्ताचा वारस म्हणजे, वारसाची व्याख्या म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव 7/12 वर असेल ती व्यक्ती, त्यांची पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी.म्हणूनच एमआयडीसीनं बर्‍याच जणांना भूखंड नाकारले. संतोष दातीर म्हणतात, आमची 15 एकर जमीन गेली, पण मी नातू म्हणून माझा अर्ज नाकारला.असा हा अजब कारभार, सामान्य लोकांना नातू म्हणून नकार पण नगरसेवकांना पणतू म्हणून होकार..

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2011 12:29 PM IST

नाशिक एमआयडीसीत नगरसेवकांने लाटला भूखंड !

दीप्ती राऊत, नाशिक

18 ऑक्टोबर

नाशिकमध्ये एमआयडीसीच्या जागेवर एकीकडे उद्योजकांचे बंगले उभे राहिले आहेत तर दुसरीकडे एमआयडीसीसाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांच्या हातात मात्र वाटाण्याच्या अक्षदा पडल्या आहेत. या स्थानिक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचं नेतृत्व करणार्‍या शिवसेनेच्या नगरसेवकाने स्वत:च भूखंड लाटल्याची तक्रार आहे.

शहराच्या औद्योगिक विकासासाठी अंबड गावातल्या शेतकर्‍यांनी 433 एकर जमीन दिली. या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना 100 चौरस मीटरचा भूखंड देण्याची तरतूद होती. प्रत्यक्षात मात्र गेल्या 30 वर्षात 135 पैकी फक्त 30-35 जणांना हे भूखंड वाटण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्त साहेबराव दातार म्हणतात, मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तेव्हा कळलं भूखंडांचे वाटप करण्यात येतंय. त्यातून लक्षात आलं स्थानिक नगरसेवक तानाजी फडोळ यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड लाटला.

या प्रकरणी सरकार दरबारी न्याय मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्तांनी भिस्त होती स्थानिक नगरसेवकांवर. पण स्थानिक नेत्यांनी लोकांना बाजुला सारलं आणि स्वत:च भूखंड लाटले. शिवसेनेचे नगरसेवक तानाजी फडोळ यांचा हा भूखंड. त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे भूखंड लाटल्याच्या तक्रारी आहेत.

तानाजी फडोळ यांनी पणजोबा रामा फडोळ यांच्या वारशाचा भूखंड मिळवला आहे. खरं तर शासनाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्ताचा वारस म्हणजे, वारसाची व्याख्या म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव 7/12 वर असेल ती व्यक्ती, त्यांची पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी.म्हणूनच एमआयडीसीनं बर्‍याच जणांना भूखंड नाकारले. संतोष दातीर म्हणतात, आमची 15 एकर जमीन गेली, पण मी नातू म्हणून माझा अर्ज नाकारला.

असा हा अजब कारभार, सामान्य लोकांना नातू म्हणून नकार पण नगरसेवकांना पणतू म्हणून होकार..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2011 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close