S M L

सरकारकडून 'टोलधाड' सुरूच

19 ऑक्टोबरसामान्य माणसावर टोलचा भार पडू देणार नाही, या सरकारचा दाव्याची आता पोलखोल झालीय. मुंबई आणि परिसरात वाहतुकीची सेवा देणार्‍या बेस्ट आणि एमएसआरटीसीकडून कोट्यवधींची टोल वसुली केली जात आहे. मुंबईत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी टोल नाक्यांवर बेस्ट आणि एसटी महामंडळाला टोल भरावा लागतो. बेस्टने आत्तापर्यंत जवळपास 43 कोटींचा टोल दिला आहे तर एसटी महामंडळाने जवळपास 373 कोटींचा टोल दिला. मुंबईतल्या वाशी, ऐरोली, ईस्टर्न एक्सप्रेस वे मुलुंड, एलबीएस मार्ग मुलुंड आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे दहिसर या पाच ठिकाणी ही वसुली करण्यात आली. अशी माहिती, माहितीच्या अधिकारांतर्गत मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी ही माहिती मिळवली. एकीकडे सरकार सामान्यांवर टोलचा बोजा टाकणार नाही, असा दावा करतंय. त्यामुळेच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी टोलमाफी देण्यात आली. पण बेस्ट आणि एसटीकडून मात्र टोल वसुली केली जाते. त्यामुळे साहजिकच हा सर्व बोजा सामान्यांवर पडतोय. आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आता याविरोधात जनहित याचिकासुद्धा करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2011 04:00 PM IST

सरकारकडून 'टोलधाड' सुरूच

19 ऑक्टोबर

सामान्य माणसावर टोलचा भार पडू देणार नाही, या सरकारचा दाव्याची आता पोलखोल झालीय. मुंबई आणि परिसरात वाहतुकीची सेवा देणार्‍या बेस्ट आणि एमएसआरटीसीकडून कोट्यवधींची टोल वसुली केली जात आहे. मुंबईत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी टोल नाक्यांवर बेस्ट आणि एसटी महामंडळाला टोल भरावा लागतो. बेस्टने आत्तापर्यंत जवळपास 43 कोटींचा टोल दिला आहे तर एसटी महामंडळाने जवळपास 373 कोटींचा टोल दिला. मुंबईतल्या वाशी, ऐरोली, ईस्टर्न एक्सप्रेस वे मुलुंड, एलबीएस मार्ग मुलुंड आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे दहिसर या पाच ठिकाणी ही वसुली करण्यात आली.

अशी माहिती, माहितीच्या अधिकारांतर्गत मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी ही माहिती मिळवली. एकीकडे सरकार सामान्यांवर टोलचा बोजा टाकणार नाही, असा दावा करतंय. त्यामुळेच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी टोलमाफी देण्यात आली. पण बेस्ट आणि एसटीकडून मात्र टोल वसुली केली जाते. त्यामुळे साहजिकच हा सर्व बोजा सामान्यांवर पडतोय. आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आता याविरोधात जनहित याचिकासुद्धा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2011 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close