S M L

किरण बेदी पुन्हा एकदा वादात

20 ऑक्टोबरभ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकणार्‍या टीम अण्णांचे सदस्य आता अडचणीत सापडत आहे. टीम अण्णांच्या सदस्या आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना काही स्वयंसेवी संस्थांनी भाषणासाठी आणि सेमिनारसाठी बोलावले होतं. मात्र यावेळी किरण बेदी यांनी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करुन बिझनेस क्लासच्या तिकीटांचे पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. सवलतीत असलेल्या विमान प्रवासाच्या तिकीटांचे काही संस्थाकडून पुर्ण पैसे वटवून घेतले होते. या संदर्भातील बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली होती. त्याबाबत किरण बेंदींनी स्पष्टीकरण दिलं. बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केल्याचे आरोप किरण बेदी यांनी मान्य केले आहे. पण यातून झालेल्या बचतीचा वापर स्वता:साठी न करता संस्थेकरीता केल्याचा दावाही बेदी यांनी केला. किरण बेदी यांनी एक पत्रकार परिषद घेवून आपल्यावरच्या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. पण आता सिव्हिल सोसायटीतूनही यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. किरण बेदींनी तर या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी स्वामी अग्नीवेश यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2011 10:37 AM IST

किरण बेदी पुन्हा एकदा वादात

20 ऑक्टोबर

भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकणार्‍या टीम अण्णांचे सदस्य आता अडचणीत सापडत आहे. टीम अण्णांच्या सदस्या आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना काही स्वयंसेवी संस्थांनी भाषणासाठी आणि सेमिनारसाठी बोलावले होतं. मात्र यावेळी किरण बेदी यांनी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करुन बिझनेस क्लासच्या तिकीटांचे पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. सवलतीत असलेल्या विमान प्रवासाच्या तिकीटांचे काही संस्थाकडून पुर्ण पैसे वटवून घेतले होते. या संदर्भातील बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली होती. त्याबाबत किरण बेंदींनी स्पष्टीकरण दिलं. बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केल्याचे आरोप किरण बेदी यांनी मान्य केले आहे. पण यातून झालेल्या बचतीचा वापर स्वता:साठी न करता संस्थेकरीता केल्याचा दावाही बेदी यांनी केला. किरण बेदी यांनी एक पत्रकार परिषद घेवून आपल्यावरच्या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला.

पण आता सिव्हिल सोसायटीतूनही यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. किरण बेदींनी तर या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी स्वामी अग्नीवेश यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2011 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close