S M L

नापास केलं म्हणून विद्यार्थ्यांचे उपोषण

20 ऑक्टोबरमुंबईतल्या जेजे कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थीनी कॉलेजच्या विरोधात उपोषणाला बसले आहे. हेतुपुरस्सर नापास केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याविरोधात हे विद्यार्थी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहे. हे विद्यार्थी तिसर्‍या वर्षाच्या प्रॅक्टिकलमध्ये नापास झाले आहे. त्यामुळे काहींना चौथ्या वर्षामध्ये एटीकेटी लागली. तर काही विद्यार्थी पुढच्या वर्षात प्रवेशच घेऊ शकलेले नाहीत. इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या मीना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना नापास केल्याचा आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. याविरोधात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौकशी समितीनेही विद्यार्थी मुंबईबाहेर असताना चौकशी केली. त्यामुळे अन्याय झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2011 05:23 PM IST

नापास केलं म्हणून विद्यार्थ्यांचे उपोषण

20 ऑक्टोबर

मुंबईतल्या जेजे कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थीनी कॉलेजच्या विरोधात उपोषणाला बसले आहे. हेतुपुरस्सर नापास केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याविरोधात हे विद्यार्थी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहे. हे विद्यार्थी तिसर्‍या वर्षाच्या प्रॅक्टिकलमध्ये नापास झाले आहे. त्यामुळे काहींना चौथ्या वर्षामध्ये एटीकेटी लागली. तर काही विद्यार्थी पुढच्या वर्षात प्रवेशच घेऊ शकलेले नाहीत. इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या मीना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना नापास केल्याचा आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. याविरोधात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौकशी समितीनेही विद्यार्थी मुंबईबाहेर असताना चौकशी केली. त्यामुळे अन्याय झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close