S M L

नवले अखेर नमले ; जमीन करणार परत !

21 ऑक्टोबरपवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची जमीन चैनसुख गांधी यांना परत करण्याची तयारी मारूती नवलेंनी दाखवली आहे. पालकांना दिलेल्या एका पत्राच्या माध्यमातुन त्यांनी ही तयारी दाखवली आहे. पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची जमीन सिंहगडच्या नवलेंनी ढापल्याचा आरोप होता. माध्यमांनी ही बाब उघडकीला आणल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात नवलेंवर गुन्हे दाखल केले होते. यानंतर आता अखेर नवलेंनी त्यांच्या सहीची पत्र पालकांना पाठवली आहेत. यामध्ये सिंहगड संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही या शाळेची जागा मुळ मालकांना परत करावी अथवा ही शाळा जवळच्याच एका ठिकाणी स्थलांतरीत केली जावी असा निर्णय झाला आहे असं या पत्रामध्ये म्हणलेलं आहे. मात्र अजून नवलेंतर्फे गांधीशी मात्र कोणीही अधिकृतपणे संपर्क साधला नाही. आम्हाला आमची जमीन परत हवी होती. आता नवले जर ही जागा परत करणार असतील तर आम्ही समाधानी आहोत असं चैनसुख गांधींनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 09:36 AM IST

नवले अखेर नमले ; जमीन करणार परत !

21 ऑक्टोबर

पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची जमीन चैनसुख गांधी यांना परत करण्याची तयारी मारूती नवलेंनी दाखवली आहे. पालकांना दिलेल्या एका पत्राच्या माध्यमातुन त्यांनी ही तयारी दाखवली आहे. पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची जमीन सिंहगडच्या नवलेंनी ढापल्याचा आरोप होता. माध्यमांनी ही बाब उघडकीला आणल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात नवलेंवर गुन्हे दाखल केले होते. यानंतर आता अखेर नवलेंनी त्यांच्या सहीची पत्र पालकांना पाठवली आहेत. यामध्ये सिंहगड संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही या शाळेची जागा मुळ मालकांना परत करावी अथवा ही शाळा जवळच्याच एका ठिकाणी स्थलांतरीत केली जावी असा निर्णय झाला आहे असं या पत्रामध्ये म्हणलेलं आहे. मात्र अजून नवलेंतर्फे गांधीशी मात्र कोणीही अधिकृतपणे संपर्क साधला नाही. आम्हाला आमची जमीन परत हवी होती. आता नवले जर ही जागा परत करणार असतील तर आम्ही समाधानी आहोत असं चैनसुख गांधींनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close