S M L

'लो कर लो बात', बैलांचीच पोलीस चौकशी !

21 ऑक्टोबरकोणत्याही चौकशीसाठी गुन्हेगार, साक्षीदार यांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. पण आज मात्र ही वेळ आली आहे चक्क 2 बैलांवरती. पुणे पोलिसांनी हा प्रताप केला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान बैलांचा छळ झाला या मुद्द्यावरुन पोलिसांनी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाच्या पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल केला. चौकशीसाठी बैलजोडीच्या मालकाला आत्तापर्यंत 3 वेळा पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं.पण तपासासाठी आज मात्र चक्क या बैलांची चौकशी पोलीस करणार आहे. आता या चौकशीत या बैलांवर झालेल्या अत्याचाराची पाहणी पोलीस करणार असल्याचं समजतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 04:50 PM IST

'लो कर लो बात', बैलांचीच पोलीस चौकशी !

21 ऑक्टोबर

कोणत्याही चौकशीसाठी गुन्हेगार, साक्षीदार यांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. पण आज मात्र ही वेळ आली आहे चक्क 2 बैलांवरती. पुणे पोलिसांनी हा प्रताप केला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान बैलांचा छळ झाला या मुद्द्यावरुन पोलिसांनी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाच्या पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल केला. चौकशीसाठी बैलजोडीच्या मालकाला आत्तापर्यंत 3 वेळा पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं.पण तपासासाठी आज मात्र चक्क या बैलांची चौकशी पोलीस करणार आहे. आता या चौकशीत या बैलांवर झालेल्या अत्याचाराची पाहणी पोलीस करणार असल्याचं समजतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close