S M L

नातू वाडाप्रकरणी मानकरसह 22 आरोपींची निर्दोष सुटका

21 ऑक्टोबरपुण्यातील नातू वाडा बळकावल्याच्या प्रकरणामध्ये सर्व 22 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. शिवाजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला. काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, दीपक मानकर याच्या सहकारी साधना वर्तक, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता सागरे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी होते. सबळ पुराव्या अभावी शिवाजीनगर सत्र न्यायालयानं ही सुटका केली. 2008 साली पुण्याच्या शुक्रवार पेठेतला यशवंत नातू यांचा वाडा जबरदस्तीने बळकावण्यात आला होता. मीडियामध्ये या बातम्या आल्यानंतर 14 जून 2009 ला पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली. पण अखेर आरोपींची निर्दोष मुक्तता झालीय. या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाण्याचा निर्णय यशवंत नातू यांनी घेतला. दरम्यान, शिवसेनेच्या खासदार नीलम गोर्‍हे यांनी या प्रकरणी दिरंगाई केल्याबद्दल पोलीस तसेच सरकारलाही जबाबदार ठरवलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 05:50 PM IST

नातू वाडाप्रकरणी मानकरसह 22 आरोपींची निर्दोष सुटका

21 ऑक्टोबर

पुण्यातील नातू वाडा बळकावल्याच्या प्रकरणामध्ये सर्व 22 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. शिवाजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला. काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, दीपक मानकर याच्या सहकारी साधना वर्तक, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता सागरे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी होते. सबळ पुराव्या अभावी शिवाजीनगर सत्र न्यायालयानं ही सुटका केली. 2008 साली पुण्याच्या शुक्रवार पेठेतला यशवंत नातू यांचा वाडा जबरदस्तीने बळकावण्यात आला होता. मीडियामध्ये या बातम्या आल्यानंतर 14 जून 2009 ला पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली. पण अखेर आरोपींची निर्दोष मुक्तता झालीय. या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाण्याचा निर्णय यशवंत नातू यांनी घेतला. दरम्यान, शिवसेनेच्या खासदार नीलम गोर्‍हे यांनी या प्रकरणी दिरंगाई केल्याबद्दल पोलीस तसेच सरकारलाही जबाबदार ठरवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close