S M L

पोस्ट ऑफिसनं थाटलं रस्त्यावरच 'दुकान' !

विलास बडे, नवी मुंबई21 ऑक्टोबरनवी मुंबई हे 21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखलं जातं. पण याच नव्या मुंबईतल्या कामोठा मानसरोवरचं पोस्ट ऑफिस मात्र चक्क रस्त्यावर भरतं आहे. 55 सेक्टरमधील साधारण 5 लाख लोकांसाठीचं हे पोस्ट ऑफिस आहेत. पण अपुर्‍या जागेअभावी हे ऑफिस दररोज रस्त्यावरच भरते. एवढंच नाही तर इथं स्वत:ची पत्र स्वतच या पत्रांच्या ढिगार्‍यातून शोधावी लागतात. या दुरवस्थेबद्दल पोस्टाच्या अधिकार्‍यांना विचारलं असता त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत बोलकं होतं. मेल ओव्हरसीस झेड एक खान, हे सरकारी काम आहे. त्यामुळे असं होणारचं हे कोणाच्या हातात नाही.या पोस्ट ऑफिसमध्ये रोज जवळपास 5000 पत्रं येतात. ती पुरण्यासाठी माणसं आहेत फक्त तीन. त्यामुळे ज्यांना या मायाजाळातून त्यांचं पत्रं मिळतं त्यांच्यासाठी जणू ती लॉटरीच ठरते. 21 व्या शतकातलं शहर म्हणून मिरवणार्‍या नव्या मुंबईसाठी,हे रस्त्यावरच पोस्ट ऑफिस, ही नक्कीच शरमेची बाब आहे..

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 05:10 PM IST

पोस्ट ऑफिसनं थाटलं रस्त्यावरच 'दुकान' !

विलास बडे, नवी मुंबई

21 ऑक्टोबर

नवी मुंबई हे 21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखलं जातं. पण याच नव्या मुंबईतल्या कामोठा मानसरोवरचं पोस्ट ऑफिस मात्र चक्क रस्त्यावर भरतं आहे. 55 सेक्टरमधील साधारण 5 लाख लोकांसाठीचं हे पोस्ट ऑफिस आहेत. पण अपुर्‍या जागेअभावी हे ऑफिस दररोज रस्त्यावरच भरते. एवढंच नाही तर इथं स्वत:ची पत्र स्वतच या पत्रांच्या ढिगार्‍यातून शोधावी लागतात. या दुरवस्थेबद्दल पोस्टाच्या अधिकार्‍यांना विचारलं असता त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत बोलकं होतं. मेल ओव्हरसीस झेड एक खान, हे सरकारी काम आहे. त्यामुळे असं होणारचं हे कोणाच्या हातात नाही.या पोस्ट ऑफिसमध्ये रोज जवळपास 5000 पत्रं येतात. ती पुरण्यासाठी माणसं आहेत फक्त तीन. त्यामुळे ज्यांना या मायाजाळातून त्यांचं पत्रं मिळतं त्यांच्यासाठी जणू ती लॉटरीच ठरते. 21 व्या शतकातलं शहर म्हणून मिरवणार्‍या नव्या मुंबईसाठी,हे रस्त्यावरच पोस्ट ऑफिस, ही नक्कीच शरमेची बाब आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close