S M L

राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंवर राणेंचा हल्लाबोल

22 ऑक्टोबरराष्ट्रवादी काँग्रेसला गर्भित इशारा देत नारायण राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वादाच्या आगीत आणखीनच तेल ओतलं. रत्नागिरीत काँग्रेस मेळाव्यात बोलताना राणेंनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच टिकेचं लक्ष केलं. राष्ट्रवादीकडे उर्जा खातं आहे, पण जैतापूरक डे कोणीही फिरकलं नाही अशी टीकाही राणेंनी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीने खडकवासलाच्या पराभवातून काही तरी शिकावे असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. निवडणुका स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे. तर शिवसेनेवर निशाना साधत उध्दव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. बाळासाहेबांनी गेल्या 40 वर्षात जे कमावलं आहे ते उध्दव पाच वर्षात संपवतील याचा विडाच त्यांनी उचलला आहे. उध्दव म्हणजे अधोगती प्रगती नाही ते तर उध्दव ठाकरे नाही उध्वस्त ठाकरे असा टोलाही राणे यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2011 02:15 PM IST

राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंवर राणेंचा हल्लाबोल

22 ऑक्टोबर

राष्ट्रवादी काँग्रेसला गर्भित इशारा देत नारायण राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वादाच्या आगीत आणखीनच तेल ओतलं. रत्नागिरीत काँग्रेस मेळाव्यात बोलताना राणेंनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच टिकेचं लक्ष केलं. राष्ट्रवादीकडे उर्जा खातं आहे, पण जैतापूरक डे कोणीही फिरकलं नाही अशी टीकाही राणेंनी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीने खडकवासलाच्या पराभवातून काही तरी शिकावे असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. निवडणुका स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे. तर शिवसेनेवर निशाना साधत उध्दव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. बाळासाहेबांनी गेल्या 40 वर्षात जे कमावलं आहे ते उध्दव पाच वर्षात संपवतील याचा विडाच त्यांनी उचलला आहे. उध्दव म्हणजे अधोगती प्रगती नाही ते तर उध्दव ठाकरे नाही उध्वस्त ठाकरे असा टोलाही राणे यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close