S M L

लवकरच 'बिग बॉस'ला 'खळ्ळ-फटॅक’; राज यांचा इशारा

22 ऑक्टोबरबिग बॉस हा जो रियालिटी शो आहे तो आता माझ्या डोक्यात गेला आहे. मराठी माणसाचं नाव घेऊन केलेली थट्टा ही अत्यंत निंदनिय आहे. याचं उत्तर त्यांना वेळ आल्यावर देऊ पण आताच त्यांच्यावर कारवाई करून पब्लिसिटी द्याची नाही. शेवटी चहा थंड करून प्याला तरी तो चहाच लागतो अशा शब्दात राज ठाकरे यांनी बिग बॉसला 'खळ्ळ-फटॅक' च्या भाषेत अद्दल घडवण्याचे संकेत दिले आहे. शुक्रवारी झालेल्या बिग बॉसच्या शोमध्ये दरवेळीप्रमाणे एका टास्क देण्यात आला. यामध्ये एका मराठी व्यक्तीची भूमिका निभावण्यात सांगितले गेले होते.यावेळी अमर उपाध्यायने मराठी नोकराची भूमिका केली होती. त्यांचं नाव 'लेले' असं ठेवण्यात आलं होतं. यावेळी बिग बॉसच्या अन्य सदस्यांनी खिल्ली उडवली होती. याच्यावर आक्षेप घेत राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलने बिग बॉसला इशारा दिला. आताच त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे शो बंद पाडून त्यांना पब्लिसिटी द्याची नाही आणि ती त्याना हवी आहे त्यामुळे चहा थंड करून प्यायला तरी तो चहाच लागतो त्यामुळे त्यांना योग्य वेळीच त्याना धडा शिकवू असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. संबंधीत चॅनलनी लेखी माफी मगावी अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2011 11:23 AM IST

लवकरच 'बिग बॉस'ला 'खळ्ळ-फटॅक’; राज यांचा इशारा

22 ऑक्टोबर

बिग बॉस हा जो रियालिटी शो आहे तो आता माझ्या डोक्यात गेला आहे. मराठी माणसाचं नाव घेऊन केलेली थट्टा ही अत्यंत निंदनिय आहे. याचं उत्तर त्यांना वेळ आल्यावर देऊ पण आताच त्यांच्यावर कारवाई करून पब्लिसिटी द्याची नाही. शेवटी चहा थंड करून प्याला तरी तो चहाच लागतो अशा शब्दात राज ठाकरे यांनी बिग बॉसला 'खळ्ळ-फटॅक' च्या भाषेत अद्दल घडवण्याचे संकेत दिले आहे.

शुक्रवारी झालेल्या बिग बॉसच्या शोमध्ये दरवेळीप्रमाणे एका टास्क देण्यात आला. यामध्ये एका मराठी व्यक्तीची भूमिका निभावण्यात सांगितले गेले होते.यावेळी अमर उपाध्यायने मराठी नोकराची भूमिका केली होती. त्यांचं नाव 'लेले' असं ठेवण्यात आलं होतं. यावेळी बिग बॉसच्या अन्य सदस्यांनी खिल्ली उडवली होती.

याच्यावर आक्षेप घेत राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलने बिग बॉसला इशारा दिला. आताच त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे शो बंद पाडून त्यांना पब्लिसिटी द्याची नाही आणि ती त्याना हवी आहे त्यामुळे चहा थंड करून प्यायला तरी तो चहाच लागतो त्यामुळे त्यांना योग्य वेळीच त्याना धडा शिकवू असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. संबंधीत चॅनलनी लेखी माफी मगावी अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close