S M L

इंग्लंडच्या व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने ?

23 ऑक्टोबरभारत-इंग्लंडदरम्यानची चौथी वनडे आज मुंबईत खेळली जात आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिग घेतली. पण इंग्लंडची सुरूवात खराब झाली. इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसले आहेत. आर अश्वीननं एक विकेट घेतली आहे. पहिल्या तीनही मॅच जिंकून भारतीय टीमने याआधीच सीरिज खिशात घातली आहे. चौथी आणि पाचवी वनडे जिंकून इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचा मानस भारतीय टीमचा असेल. सहा महिन्यांपूर्वी धोणीच्या सेनेनं वानखेडे स्टेडिअमवर वर्ल्डकप जिंकला होता. त्या आठवणी ताज्या असताना आणखीन एक विजय मिळवण्याची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांची आहे. टीममध्ये सीनिअर खेळाडू नसतानाही तरूण खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. मुंबईचा अजिंक्य रहाणे घरच्या मैदानावर पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. त्यामुळे त्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रहाणेनं मोहाली वनडेत 91 रन्स करत भारताच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली आहे. तसेच गंभीर, विराट, रैना, धोणीवर भारतीय बॅटिंगची मदार असेल. भारताच्या तरूण बॉलर्सनीही तेवढीच प्रभावी बॉलिंग केली.प्रविण, विनय कुमार,अश्विन, जडेजा यांनीही विकेट्स घेत आपली निवड योग्य ठरवली. सलग तीन पराभवामुळे इंग्लंडची टीम चांगलीच डिवचली गेली आहे. त्यामुळे मुंबई वनडे जिंकून पराभवाची मालिका संपवण्याचा प्रयत्न पाहुण्यांची टीम करेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2011 10:23 AM IST

इंग्लंडच्या व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने ?

23 ऑक्टोबर

भारत-इंग्लंडदरम्यानची चौथी वनडे आज मुंबईत खेळली जात आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिग घेतली. पण इंग्लंडची सुरूवात खराब झाली. इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसले आहेत. आर अश्वीननं एक विकेट घेतली आहे. पहिल्या तीनही मॅच जिंकून भारतीय टीमने याआधीच सीरिज खिशात घातली आहे. चौथी आणि पाचवी वनडे जिंकून इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचा मानस भारतीय टीमचा असेल.

सहा महिन्यांपूर्वी धोणीच्या सेनेनं वानखेडे स्टेडिअमवर वर्ल्डकप जिंकला होता. त्या आठवणी ताज्या असताना आणखीन एक विजय मिळवण्याची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांची आहे. टीममध्ये सीनिअर खेळाडू नसतानाही तरूण खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. मुंबईचा अजिंक्य रहाणे घरच्या मैदानावर पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे.

त्यामुळे त्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रहाणेनं मोहाली वनडेत 91 रन्स करत भारताच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली आहे. तसेच गंभीर, विराट, रैना, धोणीवर भारतीय बॅटिंगची मदार असेल. भारताच्या तरूण बॉलर्सनीही तेवढीच प्रभावी बॉलिंग केली.प्रविण, विनय कुमार,अश्विन, जडेजा यांनीही विकेट्स घेत आपली निवड योग्य ठरवली. सलग तीन पराभवामुळे इंग्लंडची टीम चांगलीच डिवचली गेली आहे. त्यामुळे मुंबई वनडे जिंकून पराभवाची मालिका संपवण्याचा प्रयत्न पाहुण्यांची टीम करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2011 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close