S M L

हिंमत असेल तर मुंबई बंद पाडून दाखवा - उध्दव ठाकरे

24 ऑक्टोबरउत्तर भारतीय लोक मुंबईवरचं ओझं नाहीत, तर मुंबईचं ओझं उत्तर भारतीय उचलत आहे जर उत्तर भारतीयांनी मनात आणलं तर मुंबई ठप्प होईल असं वक्तव्य काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी आज नागपूरमध्ये केलं. संजय निरुपम यांच्या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी खणखणीत इशारा दिला. मुंबई म्हणजे संजय निरुपमांची जहागिरदारी नाही, निरुपम यांनी मुंबई बंद पाडूनच दाखवावी त्यांना तोंडाशीच पाडू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संजय निरूपम यांना इशारा दिला. महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे आणि आता राजकारणात खलबत सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांनी आज नागपूर येथे झालेल्या जाहीर सभेत उत्तर भारतीय यांनी मनात आणलं की आज काम करायचं नाही तर मुंबई ठप्प होईल असं विधान केलं. तसेच ज्या राजकीय पक्षांना असे वाटते की परप्रांतीय मुंबईवर ओझं आहे हा त्यांचा समज चुकीचा आहे, मुंबईचा भार उत्तर भारतीयचं उचलत आहे हे ही लक्षात ठेवावे असं वक्तव्य निरूपम यांनी केलं. निरूपम यांना प्रतिउत्तर देत शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी खणखणीत इशारा दिला. मुंबई ही कोणाची जहागिरदारी नाही त्यांनी मुंबई बंद पाडण्याची हिंमत करून दाखवावी त्यांचे दात तोंडात घालून राहु असा इशारा उध्दव यांनी दिला. तर महापालिकेच्या निवडणुकीजवळ आल्या आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे त्यामुळे मत तोडण्यासाठी अशी बेफाम वक्तव्य काँग्रेस नेते करत आहे असा टोला ही उध्दव यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2011 10:54 AM IST

हिंमत असेल तर मुंबई बंद पाडून दाखवा - उध्दव ठाकरे

24 ऑक्टोबर

उत्तर भारतीय लोक मुंबईवरचं ओझं नाहीत, तर मुंबईचं ओझं उत्तर भारतीय उचलत आहे जर उत्तर भारतीयांनी मनात आणलं तर मुंबई ठप्प होईल असं वक्तव्य काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी आज नागपूरमध्ये केलं. संजय निरुपम यांच्या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी खणखणीत इशारा दिला. मुंबई म्हणजे संजय निरुपमांची जहागिरदारी नाही, निरुपम यांनी मुंबई बंद पाडूनच दाखवावी त्यांना तोंडाशीच पाडू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संजय निरूपम यांना इशारा दिला.

महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे आणि आता राजकारणात खलबत सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांनी आज नागपूर येथे झालेल्या जाहीर सभेत उत्तर भारतीय यांनी मनात आणलं की आज काम करायचं नाही तर मुंबई ठप्प होईल असं विधान केलं. तसेच ज्या राजकीय पक्षांना असे वाटते की परप्रांतीय मुंबईवर ओझं आहे हा त्यांचा समज चुकीचा आहे, मुंबईचा भार उत्तर भारतीयचं उचलत आहे हे ही लक्षात ठेवावे असं वक्तव्य निरूपम यांनी केलं. निरूपम यांना प्रतिउत्तर देत शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी खणखणीत इशारा दिला. मुंबई ही कोणाची जहागिरदारी नाही त्यांनी मुंबई बंद पाडण्याची हिंमत करून दाखवावी त्यांचे दात तोंडात घालून राहु असा इशारा उध्दव यांनी दिला. तर महापालिकेच्या निवडणुकीजवळ आल्या आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे त्यामुळे मत तोडण्यासाठी अशी बेफाम वक्तव्य काँग्रेस नेते करत आहे असा टोला ही उध्दव यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2011 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close