S M L

गुजरात दंगलीप्रकरणी मोदींवर खटले चालवले जाऊ शकता

23 ऑक्टोबरगुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदींविरोधातील खटले चालवले जाऊ शकतात अशी शिफारस ऍमिकस क्युरींच्या अहवालात करण्यात आली आहे. तसेच सर्व साक्षीदारांची उलटतपासणी झाली पाहिजे असंही ऍमिकस क्युरींनी सांगितलंय. या अहवालानुसार मोदींविरोधात दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणं आणि लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून खटला चालवला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी नेमलेल्या एसआयटीचा अहवाल आणि ऍमिकस क्युरींच्या अहवालात तफावत आढळतेय. निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या फेरतपासणी करण्याबद्दलही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2011 11:30 AM IST

गुजरात दंगलीप्रकरणी मोदींवर खटले चालवले जाऊ शकता

23 ऑक्टोबर

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदींविरोधातील खटले चालवले जाऊ शकतात अशी शिफारस ऍमिकस क्युरींच्या अहवालात करण्यात आली आहे. तसेच सर्व साक्षीदारांची उलटतपासणी झाली पाहिजे असंही ऍमिकस क्युरींनी सांगितलंय. या अहवालानुसार मोदींविरोधात दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणं आणि लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून खटला चालवला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी नेमलेल्या एसआयटीचा अहवाल आणि ऍमिकस क्युरींच्या अहवालात तफावत आढळतेय. निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या फेरतपासणी करण्याबद्दलही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2011 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close