S M L

मुंबईत होणार 'ऑक्युपाय दलाल स्ट्रीट' आंदोलन

24 ऑक्टोबरअमेरिका आणि युरोप खंडात सुरू असलेल्या ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या आंदोलनाचे पडसाद आता भारतातही उमटायला सुरूवात झाली आहे. दिवाळीनंतर भारतातही हे आंदोलन ऑक्युपाय दलाल स्ट्रीट या नावाने केले जाणार आहे. भांडवलशाही सैतान आहे आणि जगभरातील संपत्ती ही मूठभर कॉर्पाेरेट कंपन्यांच्या हातात जात आहे असं म्हणत अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर हे आंदोलन सुरू झाले. भांडवलशाहीला समर्थन देणारी धोरणं अमेरिकन सरकारने बदलावीत तोवर वॉल स्ट्रीट सोडणार नाही असं म्हणत या हजारो लोकं अमेरिकेत रस्त्यावर उतरलेत. संपूर्ण युरोपभरही या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. त्याच आंदोलनाशी जोडून घेत भारतातही आता हे आंदोलन होतंय. बड्या औद्योगिक घराण्यांसाठीच सरकार आपली धोरण राबवतेय असा आरोप करत सीपीआयने म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने या आंदोलनासाठी पुढाकार घेतलाय. दिवाळीनंतर मुंबईमध्ये दलाल स्ट्रीटवर हे आंदोलन केलं जाणार आहे. हे आंदोलन राजकीय नसून जास्तीत जास्त भांडवलशाहीविरोधी संघटनांना या आंदोलनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचंही कळतंय. दिवाळीनंतर या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2011 09:38 AM IST

मुंबईत होणार 'ऑक्युपाय दलाल स्ट्रीट' आंदोलन

24 ऑक्टोबर

अमेरिका आणि युरोप खंडात सुरू असलेल्या ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या आंदोलनाचे पडसाद आता भारतातही उमटायला सुरूवात झाली आहे. दिवाळीनंतर भारतातही हे आंदोलन ऑक्युपाय दलाल स्ट्रीट या नावाने केले जाणार आहे. भांडवलशाही सैतान आहे आणि जगभरातील संपत्ती ही मूठभर कॉर्पाेरेट कंपन्यांच्या हातात जात आहे असं म्हणत अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर हे आंदोलन सुरू झाले. भांडवलशाहीला समर्थन देणारी धोरणं अमेरिकन सरकारने बदलावीत तोवर वॉल स्ट्रीट सोडणार नाही असं म्हणत या हजारो लोकं अमेरिकेत रस्त्यावर उतरलेत. संपूर्ण युरोपभरही या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. त्याच आंदोलनाशी जोडून घेत भारतातही आता हे आंदोलन होतंय. बड्या औद्योगिक घराण्यांसाठीच सरकार आपली धोरण राबवतेय असा आरोप करत सीपीआयने म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने या आंदोलनासाठी पुढाकार घेतलाय. दिवाळीनंतर मुंबईमध्ये दलाल स्ट्रीटवर हे आंदोलन केलं जाणार आहे. हे आंदोलन राजकीय नसून जास्तीत जास्त भांडवलशाहीविरोधी संघटनांना या आंदोलनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचंही कळतंय. दिवाळीनंतर या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close