S M L

कोकणात औष्णिक प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध

24 ऑक्टोबररत्नागिरी जिल्हयात वाढणार्‍या कोळशावरच्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या विरोधासाठी शेतकरी आणि मच्छीमारांचा संघर्ष सुरु झाला आहे. मंडणगड तालुक्यातल्या बाणकोटजवळ हरिहरेश्वर पावर कंपनीच्या होऊ घातलेल्या 1600 मेगावॅट प्रस्तावित उर्जा प्रकल्पाच्याविरोधात सर्व पंचक्रोशीतले शेतकर्‍यांनी आणि मच्छीमारांनी बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध केला. प्रकल्पासाठी कंपनीला कुठल्याही शेतकर्‍याला एक इंचही जमीन विकू देणार नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. प्रकल्प परिसरात आंब्याच्या बागा आणि बाणकोट खाडीत सुरू असलेली मासेमारी धोक्यात येईल, म्हणून कोणत्याही परिस्थतीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. शेतकरी आणि मच्छीमारांच्या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रकल्पविरोधी संघटनांचे प्रतिनिधी तसंच जपानमधील पर्यावरण तज्ज्ञही उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2011 02:36 PM IST

कोकणात औष्णिक प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध

24 ऑक्टोबर

रत्नागिरी जिल्हयात वाढणार्‍या कोळशावरच्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या विरोधासाठी शेतकरी आणि मच्छीमारांचा संघर्ष सुरु झाला आहे. मंडणगड तालुक्यातल्या बाणकोटजवळ हरिहरेश्वर पावर कंपनीच्या होऊ घातलेल्या 1600 मेगावॅट प्रस्तावित उर्जा प्रकल्पाच्याविरोधात सर्व पंचक्रोशीतले शेतकर्‍यांनी आणि मच्छीमारांनी बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध केला. प्रकल्पासाठी कंपनीला कुठल्याही शेतकर्‍याला एक इंचही जमीन विकू देणार नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. प्रकल्प परिसरात आंब्याच्या बागा आणि बाणकोट खाडीत सुरू असलेली मासेमारी धोक्यात येईल, म्हणून कोणत्याही परिस्थतीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. शेतकरी आणि मच्छीमारांच्या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रकल्पविरोधी संघटनांचे प्रतिनिधी तसंच जपानमधील पर्यावरण तज्ज्ञही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2011 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close