S M L

किल्ले तयार करण्यात बच्चे कंपनी मग्न

25 ऑक्टोबरदिवाळीला फराळ, रांगोळ्या, आकाशकंदिलासोबत उत्सुकता असते ती किल्ले बनवण्याची.. कोल्हापुरात बच्चेकंपनी किल्ले बांधणीच्या कामात गुंतली आहे. परीक्षा संपेपर्यंत कोणते किल्ले उभारायचे हा विचार करण्यात सर्वजण गुंगलेले असतात. दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या किल्ल्यांना असणार्‍या महत्वानुसार या किल्ल्यांची माहिती गोळी करतात आणि नंतर तोच किल्ला बांधला जातो. दगड ,माती , विटा आणि विविध साहित्यापासून बनविलेले किल्ले पाहणार्‍याला थक्क करुन सोडतात. किल्ल्याचे रक्षण करणारे मावळेही यामध्ये रक्षण करतांना दिसतात. शिवशाहीचे प्रतीक असलेले गडकिल्ले हे मुलांच्या आकर्षणाचा विषय. दरवर्षी रायगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी असे वेगवेगळे किल्ले उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2011 07:45 AM IST

किल्ले तयार करण्यात बच्चे कंपनी मग्न

25 ऑक्टोबर

दिवाळीला फराळ, रांगोळ्या, आकाशकंदिलासोबत उत्सुकता असते ती किल्ले बनवण्याची.. कोल्हापुरात बच्चेकंपनी किल्ले बांधणीच्या कामात गुंतली आहे. परीक्षा संपेपर्यंत कोणते किल्ले उभारायचे हा विचार करण्यात सर्वजण गुंगलेले असतात. दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या किल्ल्यांना असणार्‍या महत्वानुसार या किल्ल्यांची माहिती गोळी करतात आणि नंतर तोच किल्ला बांधला जातो. दगड ,माती , विटा आणि विविध साहित्यापासून बनविलेले किल्ले पाहणार्‍याला थक्क करुन सोडतात. किल्ल्याचे रक्षण करणारे मावळेही यामध्ये रक्षण करतांना दिसतात. शिवशाहीचे प्रतीक असलेले गडकिल्ले हे मुलांच्या आकर्षणाचा विषय. दरवर्षी रायगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी असे वेगवेगळे किल्ले उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2011 07:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close