S M L

कोकणात आघाडीत बिघाडी ;निवडणुकांच्या तोंडावर निधीचा वाद

दिनेश केळुसकर,रत्नागिरी 31 ऑक्टोबरनगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षातच वैमनस्य निर्माण झालं आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका करत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. निवडणुकीआधीच निर्माण झालेली ही कटुता सेना भाजपाच्या मात्र पथ्यावरच पडणारी आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कामांना रत्नागिरीच्य पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नाही म्हणून खासदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकला. पण या बहिष्काराची दखल न घेता भास्कर जाधव यांनी आपण सर्वांना समान न्यायानेच निधी देत असल्याचं स्प्ष्ट केलं.रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव म्हणतात, त्यांची पत्र मला मिळाली नाहीत. शेवटी कितीही कामं मोठी असली तरी कोणत्यातरी एकाच लोकप्रतिनिधीला एवढा निधी देता येणार नाही. त्यांच्या अपेक्षा मोठ्या असू शकतात. पालकमंत्र्यांच्या या भुमिकेमुळे चिडलेल्या राणे पितापुत्रांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीला टीकेचं लक्ष्य केलं. निलेश राणे म्हणतात, हे षडयंत्र लक्षात घ्या तुम्ही, इथे राणेंची जी कारकीर्द आहे. जी राजकीय परिस्थिती आहे. ती संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. आणि हे इथून नाही चालत आहे. तर बारामतीवरून त्यांना तशा सूचना मिळाल्या आहे. तर राणे म्हणतात, मला सांगा ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेलं एकतरी उजवं काम सांगा रा़ष्ट्रवादीच्या खात्यातून इरिगेशनला कोकणाला 350 कोटी देतो म्हणून सांगितले. गेली तीन वर्षं नाही. अजित पवारांना सांगतो रिलीज करा. कुठल्या कामासाठी जास्तीचे पैसे राष्ट्रवादीच्या खात्यातून मिळाले ? पैसे न देता विकास न करता तुम्ही जास्त सीट मिळवणार आणि आम्ही पाहत राहणार.. कसा आकडा वर जातो तो तुमचा ..! असा हल्लाच राणे यांनी केलास्थनिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभागरचनेत झालेले बदल आणि महिलांसाठी 50 टक्के आरक्षण या बदलांवर निवडणुकांना सामोर जाताना मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना प्रत्यक्षात मदत करतील का याबाबत शंका आहे. वेळ पडल्यास स्वबळावरही निवडणुका लढ़वण्यास काँग्रेस तयार असल्याचा इशाराही नारायण राणे यांनी देऊन ठेवला. त्यामुळे या सगळ्याबाबत आता राष्ट्रवादी काय भुमिका घेते याकडे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2011 09:42 AM IST

कोकणात आघाडीत बिघाडी ;निवडणुकांच्या तोंडावर निधीचा वाद

दिनेश केळुसकर,रत्नागिरी

31 ऑक्टोबर

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षातच वैमनस्य निर्माण झालं आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका करत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. निवडणुकीआधीच निर्माण झालेली ही कटुता सेना भाजपाच्या मात्र पथ्यावरच पडणारी आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कामांना रत्नागिरीच्य पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नाही म्हणून खासदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकला. पण या बहिष्काराची दखल न घेता भास्कर जाधव यांनी आपण सर्वांना समान न्यायानेच निधी देत असल्याचं स्प्ष्ट केलं.रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव म्हणतात, त्यांची पत्र मला मिळाली नाहीत. शेवटी कितीही कामं मोठी असली तरी कोणत्यातरी एकाच लोकप्रतिनिधीला एवढा निधी देता येणार नाही. त्यांच्या अपेक्षा मोठ्या असू शकतात. पालकमंत्र्यांच्या या भुमिकेमुळे चिडलेल्या राणे पितापुत्रांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीला टीकेचं लक्ष्य केलं.

निलेश राणे म्हणतात, हे षडयंत्र लक्षात घ्या तुम्ही, इथे राणेंची जी कारकीर्द आहे. जी राजकीय परिस्थिती आहे. ती संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. आणि हे इथून नाही चालत आहे. तर बारामतीवरून त्यांना तशा सूचना मिळाल्या आहे. तर राणे म्हणतात, मला सांगा ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेलं एकतरी उजवं काम सांगा रा़ष्ट्रवादीच्या खात्यातून इरिगेशनला कोकणाला 350 कोटी देतो म्हणून सांगितले. गेली तीन वर्षं नाही. अजित पवारांना सांगतो रिलीज करा. कुठल्या कामासाठी जास्तीचे पैसे राष्ट्रवादीच्या खात्यातून मिळाले ? पैसे न देता विकास न करता तुम्ही जास्त सीट मिळवणार आणि आम्ही पाहत राहणार.. कसा आकडा वर जातो तो तुमचा ..! असा हल्लाच राणे यांनी केला

स्थनिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभागरचनेत झालेले बदल आणि महिलांसाठी 50 टक्के आरक्षण या बदलांवर निवडणुकांना सामोर जाताना मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना प्रत्यक्षात मदत करतील का याबाबत शंका आहे. वेळ पडल्यास स्वबळावरही निवडणुका लढ़वण्यास काँग्रेस तयार असल्याचा इशाराही नारायण राणे यांनी देऊन ठेवला. त्यामुळे या सगळ्याबाबत आता राष्ट्रवादी काय भुमिका घेते याकडे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2011 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close