S M L

वीज दरवाढीचा शॉक ; 41 पैशांनी वाढ

31 ऑक्टोबरअखेर महावितरणने दिवाळीनंतर ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला आहे. महावितरणने प्रत्येक युनिटमागे 41 पैसे वीज दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक युनिटमागे 41 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. मात्र ही दरवाढ महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मंुबई वगळता राज्यातील उर्वतरित वीज ग्राहकांना लागू होणार आहे. उद्यापासून महावितरण कंपनीच्या ग्राहकांना सरासरी 41 पैसे प्रति युनिट जादा मोजावे लागणारे आहेत. त्यातही घरगुती वीज वापरणार्‍या सर्व सामान्य ग्राहकांना 44 पैसे प्रतियुनिट जादा ज्यादा द्यावे लागणार आहेत ही दरवाढ 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महावितरण कंपणीने 5,155 कोटी रुपयांची वीज दरवाढ मागितली होती. पण, एमईआरसीने 3265 कोटी रुपयांच्या दरवाढीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2011 03:15 PM IST

वीज दरवाढीचा शॉक ; 41 पैशांनी वाढ

31 ऑक्टोबर

अखेर महावितरणने दिवाळीनंतर ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला आहे. महावितरणने प्रत्येक युनिटमागे 41 पैसे वीज दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक युनिटमागे 41 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. मात्र ही दरवाढ महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मंुबई वगळता राज्यातील उर्वतरित वीज ग्राहकांना लागू होणार आहे. उद्यापासून महावितरण कंपनीच्या ग्राहकांना सरासरी 41 पैसे प्रति युनिट जादा मोजावे लागणारे आहेत. त्यातही घरगुती वीज वापरणार्‍या सर्व सामान्य ग्राहकांना 44 पैसे प्रतियुनिट जादा ज्यादा द्यावे लागणार आहेत ही दरवाढ 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महावितरण कंपणीने 5,155 कोटी रुपयांची वीज दरवाढ मागितली होती. पण, एमईआरसीने 3265 कोटी रुपयांच्या दरवाढीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2011 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close