S M L

आता पोस्ट ऑफिसच आपल्या दारी

प्राची कुलकर्णी, पुणे01 नोव्हेंबरएसएमएस मोबाईलच्या जमान्यामध्ये पोस्ट ऑफिसचा जवळपास आपल्याला विसरच पडला असं चित्र दिसून येत आहे. पत्र पाठवायचं म्हणलं तरी कोण त्या पोस्ट ऑफिस पर्यंत जाणार असा विचार होतो. पण जर पोस्ट ऑफिसच तुमच्या घरी आलं तर ? राज्यातलं पहिलं पोस्ट ऑफिस ऑन व्हिल्स पुण्यामध्ये सुरु झालंय. ज्याच्या माध्यमातुन थेट पोस्टऑफिसच तुमच्या घरी येणार आहे. अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत कोणाशी संपर्क साधायचा म्हणलं तर पोस्ट ऑफिस शिवाय पर्याय नव्हता. अनेक ठिकाणी तर टेलिफोनची सेवाही फक्त पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध होती. पण आता घरोघरी फोन मोबाईलची सेवा उपलब्ध झाली. त्यानंतर इंटरनेटही दाखल झालं, आणि पोस्टाचा जणू अनेकांना विसरच पडला. कोण त्या पोस्ट ऑफिस पर्यंत जाणार असा काहीसा विचार व्हायला लागला. खासगी कुरीयर्सची सेवाही फास्ट झाली. यातूनच आली ती पोस्ट ऑफिस ऑन व्हील्सची संकल्पना. वेगवेगळ्या भागांमधून आता हे पोस्ट ऑफिसच फिरणार आहे. राज्यातल्या पहिल्या पोस्ट ऑफिस ऑन व्हील्सचं आज पुण्यामध्ये उद्घाटन झालं. फक्त पत्र पाठवणंच नाही तर त्याबरोबरच इतर अनेक सुविधाही या पोस्ट ऑफिस मध्ये दिल्या जाणार आहेत. पोस्टातीलं बचत खातं, मनीऑर्डर,अशा अनेक सुविधा तुम्हाला या पोस्ट ऑफिसमध्ये अनुभवता येणार आहेत. त्याबरोबरच पोस्टात मिळणारे छोटुकुल कुलर सारखे प्रॉडक्ट्सही तुम्हाला या पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहेत. शहराबरोबर याचा मुख्य फायदा होणार आहे तो ग्रामीण भागातल्या जनतेला. पुण्यामध्ये सुरुवात झालेली ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबवली जात आहे. लोकांचा प्रतिसाद पाहुन इतर भागामध्येही असंच पोस्टऑफिस ऑन व्हील्सच सुरु केलं जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2011 02:21 PM IST

आता पोस्ट ऑफिसच आपल्या दारी

प्राची कुलकर्णी, पुणे

01 नोव्हेंबर

एसएमएस मोबाईलच्या जमान्यामध्ये पोस्ट ऑफिसचा जवळपास आपल्याला विसरच पडला असं चित्र दिसून येत आहे. पत्र पाठवायचं म्हणलं तरी कोण त्या पोस्ट ऑफिस पर्यंत जाणार असा विचार होतो. पण जर पोस्ट ऑफिसच तुमच्या घरी आलं तर ? राज्यातलं पहिलं पोस्ट ऑफिस ऑन व्हिल्स पुण्यामध्ये सुरु झालंय. ज्याच्या माध्यमातुन थेट पोस्टऑफिसच तुमच्या घरी येणार आहे.

अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत कोणाशी संपर्क साधायचा म्हणलं तर पोस्ट ऑफिस शिवाय पर्याय नव्हता. अनेक ठिकाणी तर टेलिफोनची सेवाही फक्त पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध होती. पण आता घरोघरी फोन मोबाईलची सेवा उपलब्ध झाली. त्यानंतर इंटरनेटही दाखल झालं, आणि पोस्टाचा जणू अनेकांना विसरच पडला. कोण त्या पोस्ट ऑफिस पर्यंत जाणार असा काहीसा विचार व्हायला लागला. खासगी कुरीयर्सची सेवाही फास्ट झाली. यातूनच आली ती पोस्ट ऑफिस ऑन व्हील्सची संकल्पना. वेगवेगळ्या भागांमधून आता हे पोस्ट ऑफिसच फिरणार आहे. राज्यातल्या पहिल्या पोस्ट ऑफिस ऑन व्हील्सचं आज पुण्यामध्ये उद्घाटन झालं.

फक्त पत्र पाठवणंच नाही तर त्याबरोबरच इतर अनेक सुविधाही या पोस्ट ऑफिस मध्ये दिल्या जाणार आहेत. पोस्टातीलं बचत खातं, मनीऑर्डर,अशा अनेक सुविधा तुम्हाला या पोस्ट ऑफिसमध्ये अनुभवता येणार आहेत. त्याबरोबरच पोस्टात मिळणारे छोटुकुल कुलर सारखे प्रॉडक्ट्सही तुम्हाला या पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहेत. शहराबरोबर याचा मुख्य फायदा होणार आहे तो ग्रामीण भागातल्या जनतेला.

पुण्यामध्ये सुरुवात झालेली ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबवली जात आहे. लोकांचा प्रतिसाद पाहुन इतर भागामध्येही असंच पोस्टऑफिस ऑन व्हील्सच सुरु केलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2011 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close