S M L

एअर इंडियाच्या 101 पायलट्सचा राजीनाम्याचा इशारा

01 नोव्हेंबरएअर इंडियाच्या एकशे एक पायलट्सनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मॅनेजमेंटला पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी कळवली आहे. एअर इंडियाचे अधिकारी पायलट्सना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. पायलटसना देणार्‍या सुविधांमध्ये असमानताआहे, याचबद्दलची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे, यावरची सुनावणी उद्या होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 23 पायलट्सनी आजारी असल्याचं कारण दिलं आहे. आजची सात ते आठ उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. याआधी गेल्या आठवडयात 10 उड्डाणं रद्द करावी लागली होती. बोईंग ड्रिमलायनर एअरक्राफ्टच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा समावेश करण्यात आला नाही असा आरोप या पायलट्सनी केला आहे.101 पायलट्सनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठी त्यांनी ना हरकत प्रमाणपत्रही मिळवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2011 11:39 AM IST

एअर इंडियाच्या 101 पायलट्सचा राजीनाम्याचा इशारा

01 नोव्हेंबर

एअर इंडियाच्या एकशे एक पायलट्सनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मॅनेजमेंटला पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी कळवली आहे. एअर इंडियाचे अधिकारी पायलट्सना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. पायलटसना देणार्‍या सुविधांमध्ये असमानताआहे, याचबद्दलची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे, यावरची सुनावणी उद्या होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 23 पायलट्सनी आजारी असल्याचं कारण दिलं आहे. आजची सात ते आठ उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. याआधी गेल्या आठवडयात 10 उड्डाणं रद्द करावी लागली होती. बोईंग ड्रिमलायनर एअरक्राफ्टच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा समावेश करण्यात आला नाही असा आरोप या पायलट्सनी केला आहे.101 पायलट्सनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठी त्यांनी ना हरकत प्रमाणपत्रही मिळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2011 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close