S M L

पुण्यात टेकड्यांवर बांधकामाला मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल

01 ऑक्टोबरपुणे शहराच्या जुन्या हद्दीतल्या समाविष्ट झालेल्या गावांमध्ये टेकड्यांवर चार टक्के बांधकाम करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकुलता दर्शवली. पुण्यात काँग्रेस भवनात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. याआधी काँग्रेसचा अशाप्रकारे बांधकाम करायला विरोध होता. तर राष्ट्रवादीने मात्र चार टक्के बांधकामासाठी आग्रह धरला होता. एकूणच राष्ट्रवादीपुढे काँग्रेसने शरणागती पत्करल्याचं मानलं जातंय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये मेट्रोरेल्वे प्रकल्प राबवू असं आश्वासनही दिलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वातावरण पेटताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. ग्रीन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजेच हरित विकास आराखड्याचा आग्रह धरणार्‍या काँग्रेसने घूमजाव केल्याबद्दल वंदना चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. पण वंदना चव्हाण यांचं मत वैयक्तिक असल्याचं पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण निर्णय घ्यायला 8 वर्ष लागल्याचं सांगत त्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. तर शिवसेना आणि मनसेनं मात्र चार टक्के बांधकामाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2011 11:45 AM IST

पुण्यात टेकड्यांवर बांधकामाला मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल

01 ऑक्टोबर

पुणे शहराच्या जुन्या हद्दीतल्या समाविष्ट झालेल्या गावांमध्ये टेकड्यांवर चार टक्के बांधकाम करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकुलता दर्शवली. पुण्यात काँग्रेस भवनात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. याआधी काँग्रेसचा अशाप्रकारे बांधकाम करायला विरोध होता. तर राष्ट्रवादीने मात्र चार टक्के बांधकामासाठी आग्रह धरला होता. एकूणच राष्ट्रवादीपुढे काँग्रेसने शरणागती पत्करल्याचं मानलं जातंय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये मेट्रोरेल्वे प्रकल्प राबवू असं आश्वासनही दिलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वातावरण पेटताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. ग्रीन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजेच हरित विकास आराखड्याचा आग्रह धरणार्‍या काँग्रेसने घूमजाव केल्याबद्दल वंदना चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. पण वंदना चव्हाण यांचं मत वैयक्तिक असल्याचं पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण निर्णय घ्यायला 8 वर्ष लागल्याचं सांगत त्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. तर शिवसेना आणि मनसेनं मात्र चार टक्के बांधकामाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2011 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close