S M L

ठाण्यात खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक संपावर

02 नोव्हेंबरठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक त्रस्त आहेत. याचाच विरोध म्हणून रिक्षा चालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. वारंवार निवेदन देऊनही कामाला सुरुवात होत नसल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील दीड हजार रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. दिवाळीच्या आधी बदलापूर नगरपालिकेने सव्वा दोन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. पण दिवाळीनंतरही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेवटी हा बंद पुकारण्यात आला. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरु राहिल असा इशारा रिक्षा संघटनांनी दिला. या बंदला नागरिकांनीही पाठिंबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2011 12:49 PM IST

ठाण्यात खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक संपावर

02 नोव्हेंबर

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक त्रस्त आहेत. याचाच विरोध म्हणून रिक्षा चालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. वारंवार निवेदन देऊनही कामाला सुरुवात होत नसल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील दीड हजार रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. दिवाळीच्या आधी बदलापूर नगरपालिकेने सव्वा दोन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. पण दिवाळीनंतरही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेवटी हा बंद पुकारण्यात आला. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरु राहिल असा इशारा रिक्षा संघटनांनी दिला. या बंदला नागरिकांनीही पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2011 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close