S M L

पेट्रोल 1 रुपये 80 पैशांनी महाग

03 नोव्हेंबरअखेर महागाईच्या भडक्यात पेट्रोलचे वाढीव दर ओतण्यात आले. आज इंडियन ऑइलने पेट्रोलच्या किमतीत एक रुपये 80 पैशांची वाढ झाली आहे. आज रात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. इंडियन ऑईलबरोबरच इतर कंपन्याही पेट्रोलचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतींमध्येही वाढ होणार आहे अशीही माहिती मिळत आहे. सप्टेंबर महिन्यातच पेट्रोलचे दर 5 रुपयांनी वाढले होते. त्यानंतर लगेचच ही दुसरी दरवाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आहे. तसेच रुपयाची किंमत घसरतंय. त्यामुळे इंडियन आईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांचे 1 लाख 30 हजार कोटींचे नुकसान होतं आहे. त्यासाठीच पेट्रोलचे दर वाढवण्यात आले आहेत. इंडियन ऑईलची आज मध्यरात्रीपासून वाढलेली दरवाढ कशी असेल ?मुंबई- आधी - 71.62 रूपयेआता- 73.42 रूपयेपुणे-आधी 71.83 रूपयेआता 73.63 रूपयेनाशिक-आधी- 71.54 रूपयेआता- 73.34 रूपयेकोल्हापूर- आधी- 73.75 रूपयेआता- 75.55 रूपयेनागपूर- आधी- 73.96 रूपयेआता- 75.76 रूपयेऔरंगाबाद-आधी- 71.80 रूपयेआता- 73.60 रूपये

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2011 03:40 PM IST

पेट्रोल 1 रुपये 80 पैशांनी महाग

03 नोव्हेंबर

अखेर महागाईच्या भडक्यात पेट्रोलचे वाढीव दर ओतण्यात आले. आज इंडियन ऑइलने पेट्रोलच्या किमतीत एक रुपये 80 पैशांची वाढ झाली आहे. आज रात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. इंडियन ऑईलबरोबरच इतर कंपन्याही पेट्रोलचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतींमध्येही वाढ होणार आहे अशीही माहिती मिळत आहे. सप्टेंबर महिन्यातच पेट्रोलचे दर 5 रुपयांनी वाढले होते. त्यानंतर लगेचच ही दुसरी दरवाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आहे. तसेच रुपयाची किंमत घसरतंय. त्यामुळे इंडियन आईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांचे 1 लाख 30 हजार कोटींचे नुकसान होतं आहे. त्यासाठीच पेट्रोलचे दर वाढवण्यात आले आहेत.

इंडियन ऑईलची आज मध्यरात्रीपासून वाढलेली दरवाढ कशी असेल ?

मुंबई- आधी - 71.62 रूपयेआता- 73.42 रूपये

पुणे-आधी 71.83 रूपयेआता 73.63 रूपयेनाशिक-आधी- 71.54 रूपयेआता- 73.34 रूपये

कोल्हापूर- आधी- 73.75 रूपयेआता- 75.55 रूपयेनागपूर- आधी- 73.96 रूपयेआता- 75.76 रूपये

औरंगाबाद-आधी- 71.80 रूपयेआता- 73.60 रूपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2011 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close