S M L

पाक खेळाडूंना तुरूंगवास

03 नोव्हेंबरस्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा सोक्षमोक्ष अखेर लागला आणि लंडनच्या साऊथवार्क क्राऊन कोर्टाने बुकी माजिदसह तीनही क्रिकेटर्सना शिक्षा सुनावली. बुकी माजिदला फिक्सिंग घडवून आणल्याबद्दल सर्वाधिक शिक्षा झाली. त्याला 2 वर्षं आणि 8 महिन्यांची तर पाक क्रिकेट टीममधला फिक्सिंगचा सूत्रधार आणि तेव्हाचा कॅप्टन सलमान बट्टला 2 वर्षं 6 महिन्यांची कैद झाली. महम्मद आसिफला 1 वर्षं तर आमीरला 6 महिने तुरुंगात रहावं लागणार आहे. आमीर सध्या फक्त 19 वर्षांचा आहे. त्याच्या लहान वयामुळे त्याला तुरुंगात पाठवता येणार नाही. त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात येणार आहे. खेळाडूंना तातडीने लंडन जवळ वॉन्ड्सवर्थ तुरुंगात ठेवलं जाणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना शिक्षा झालीय आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंना तुरुंगवासाची शिक्षा झाली. खेळाडूंवर कोणते आरोप ठेवण्यात आले - पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट्टला 2 वर्ष 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. बट्टवर फिक्सिंग कटाचा सूत्रधार तसेच कोर्टाची फसवणुक केल्याचे आरोप ठेवण्यात आला.- तर फास्ट बॉलर मोहम्मद आसिफला 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. आसिफवर पैसे घेऊन नो बॉल टाकण्याचा आरोप ठेवण्यात आला. - मोहम्मद आमिरच्या खटल्याची सुनावणी सुरु असताना माफीचा साक्षीदार बनला होता. त्यामुळे त्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावरही पैसे घेऊन नो बॉल टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला.या निर्णयानंतर ट्विटरवरही माजी क्रिकेटर्सच्या प्रतिक्रियाइम्रान खानपाकिस्तानचा माजी क्रिकेट कॅप्टन आणि सध्याचा राजकीय नेता इम्रान खान म्हणतो, शिक्षा योग्यच आहे. आम्ही सत्तेत आलो तर फिक्सिंगचा प्रश्न आम्ही विधायक मार्गाने सोडवू. टोनी ग्रेगखेळाडू या निकालामुळे नक्की जागे झाले असतील. सध्याचे आणि जुने काही खेळाडू केवळ नशिबाने यातून वाचलेत. त्यांनीही निकाल लक्षपूर्वक वाचला पाहिजे.शिशिर हट्टंगडीलंडनमधल्या तुरुंगात नेट्स आणि जिम आहेत अशी अपेक्षा करुया..तिथे नोबॉल कधीच टाकले जाणार नाहीत एवढं नक्की. जेमी ऑल्टरक्रिकेटमध्ये जेल प्रिमिअर लीग झाली तर वॉन्ड्सवर्थ तुरुंग नक्की जिंकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2011 11:05 AM IST

पाक खेळाडूंना तुरूंगवास

03 नोव्हेंबर

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा सोक्षमोक्ष अखेर लागला आणि लंडनच्या साऊथवार्क क्राऊन कोर्टाने बुकी माजिदसह तीनही क्रिकेटर्सना शिक्षा सुनावली. बुकी माजिदला फिक्सिंग घडवून आणल्याबद्दल सर्वाधिक शिक्षा झाली. त्याला 2 वर्षं आणि 8 महिन्यांची तर पाक क्रिकेट टीममधला फिक्सिंगचा सूत्रधार आणि तेव्हाचा कॅप्टन सलमान बट्टला 2 वर्षं 6 महिन्यांची कैद झाली. महम्मद आसिफला 1 वर्षं तर आमीरला 6 महिने तुरुंगात रहावं लागणार आहे. आमीर सध्या फक्त 19 वर्षांचा आहे. त्याच्या लहान वयामुळे त्याला तुरुंगात पाठवता येणार नाही. त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात येणार आहे. खेळाडूंना तातडीने लंडन जवळ वॉन्ड्सवर्थ तुरुंगात ठेवलं जाणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना शिक्षा झालीय आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंना तुरुंगवासाची शिक्षा झाली. खेळाडूंवर कोणते आरोप ठेवण्यात आले - पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट्टला 2 वर्ष 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. बट्टवर फिक्सिंग कटाचा सूत्रधार तसेच कोर्टाची फसवणुक केल्याचे आरोप ठेवण्यात आला.

- तर फास्ट बॉलर मोहम्मद आसिफला 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. आसिफवर पैसे घेऊन नो बॉल टाकण्याचा आरोप ठेवण्यात आला.

- मोहम्मद आमिरच्या खटल्याची सुनावणी सुरु असताना माफीचा साक्षीदार बनला होता. त्यामुळे त्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावरही पैसे घेऊन नो बॉल टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला.या निर्णयानंतर ट्विटरवरही माजी क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया

इम्रान खानपाकिस्तानचा माजी क्रिकेट कॅप्टन आणि सध्याचा राजकीय नेता इम्रान खान म्हणतो, शिक्षा योग्यच आहे. आम्ही सत्तेत आलो तर फिक्सिंगचा प्रश्न आम्ही विधायक मार्गाने सोडवू.

टोनी ग्रेगखेळाडू या निकालामुळे नक्की जागे झाले असतील. सध्याचे आणि जुने काही खेळाडू केवळ नशिबाने यातून वाचलेत. त्यांनीही निकाल लक्षपूर्वक वाचला पाहिजे.

शिशिर हट्टंगडीलंडनमधल्या तुरुंगात नेट्स आणि जिम आहेत अशी अपेक्षा करुया..तिथे नोबॉल कधीच टाकले जाणार नाहीत एवढं नक्की.

जेमी ऑल्टरक्रिकेटमध्ये जेल प्रिमिअर लीग झाली तर वॉन्ड्सवर्थ तुरुंग नक्की जिंकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close