S M L

अडवाणींची जनचेतना यात्रा मुंबईत दाखल

04 नोव्हेंबरभाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा आज 26 व्या दिवशी मुंबईत दाखल झाली. ऐरोली भांडूप चेकपोस्टवर या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रातील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यानंतर ही यात्रा मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड मार्गे जोगेश्वरीपर्यंत पाहोचलीय. रात्री 8 वाजताच्या सुमारास बोरीवली इथल्या कोरा केंद्र ग्राऊंडवर लालकृष्ण अडवाणींची जाहीर सभा होणार आहे. बोरीवली इथंच उद्या सकाळी लालकृष्ण अडवाणी पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर त्यांची यात्रा गुजरातच्या दिशेने रवाना होईल. दरम्यान, जनचेतना यात्रेच्या निमित्ताने तळेगाव इथं सभा झाली. सभेच्या ठिकाणी मावळ गोळीबारात मृत्यूमुखी केलेल्या मृतांच्या नातेवाईकांची अडवाणींनी भेट घेतली. अडवाणींनी त्यांचं सांत्वन केलं. मावळमधील शेतकर्‍यांवर आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता..

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2011 02:07 PM IST

अडवाणींची जनचेतना यात्रा  मुंबईत दाखल

04 नोव्हेंबर

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा आज 26 व्या दिवशी मुंबईत दाखल झाली. ऐरोली भांडूप चेकपोस्टवर या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रातील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यानंतर ही यात्रा मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड मार्गे जोगेश्वरीपर्यंत पाहोचलीय. रात्री 8 वाजताच्या सुमारास बोरीवली इथल्या कोरा केंद्र ग्राऊंडवर लालकृष्ण अडवाणींची जाहीर सभा होणार आहे. बोरीवली इथंच उद्या सकाळी लालकृष्ण अडवाणी पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर त्यांची यात्रा गुजरातच्या दिशेने रवाना होईल.

दरम्यान, जनचेतना यात्रेच्या निमित्ताने तळेगाव इथं सभा झाली. सभेच्या ठिकाणी मावळ गोळीबारात मृत्यूमुखी केलेल्या मृतांच्या नातेवाईकांची अडवाणींनी भेट घेतली. अडवाणींनी त्यांचं सांत्वन केलं. मावळमधील शेतकर्‍यांवर आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2011 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close