S M L

किनन, रुबेन हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात

04 नोव्हेंबरमुंबईत काही दिवसांपूर्वी दोन तरुणांची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. मुलीची छेड काढणार्‍या गुंडाचा विरोध केला म्हणून त्या गुंडांनी दोन तरुणांना चाकू भोसकला. ही मर्डर केस आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. तसेच मृतक तरुणांचे कुटुंबिय मागतील तो वकील देण्याची तयारीसुद्धा आर. आर. पाटलांनी दाखवली. मुलीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून मुंबईतल्या दोन तरुणांना जीव गमवावा लागला. ऐन तारुण्यात केनन आणि रुबेन यांची चाकूने भोसकून हत्या झाली आणि रस्तावर उभे असलेलं कुणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. 24 वर्षांचा केनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली. मुलीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून त्यांची हत्या झाली आणि मुंबईकर मूकदर्शक होऊन बघत होते. रुबेनचा सोमवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर केनानचा 11 दिवसांआधीच मृत्यू झाला.अंधेरी भागातल्या अंबोली रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर केनन, रुबेन आणि त्यांचे पाच मित्र रात्री अकरा वाजता पान खान्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या जीतेंद्र राणा या मुलाने केननच्या मैत्रिणीची छेड काढली आणि यावरुन केनन आणि जीतेंद्र यांच्यात वाद झाला. या वादानंतर राणा तिथून गेला आणि थोड्या वेळातच आपल्या 20 मित्रांसोबत तो परत आला. त्यानंतर त्यांनी केनन आणि रुबेन यांची चाकू भोसकून हत्या केली. मृत केननचे वडील वॅलेरियन सँन्टोज म्हणतात, या गुंडांना अशी मोकळीक का दिली गेलीय. त्यांच्याविरोधात काहीच कारवाई का होत नाही.मन हेलावून टाकणार्‍या या घटनेविरोधात सोशल नेटवर्किंग साईटवरसुद्धा तीव्र संताप व्यक्त होतोय. केनन आणि रुबेनच्या कुटुंबीयांचे अश्रू आता थांबलेत. पण संताप कायम आहे. आमच्या मुलांचं हौताम्य वाया जाणार नाही, यासाठी अधिकारी काय करणार, हा एकच प्रश्न हे कुटुंबीय विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2011 02:37 PM IST

किनन, रुबेन हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात

04 नोव्हेंबर

मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन तरुणांची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. मुलीची छेड काढणार्‍या गुंडाचा विरोध केला म्हणून त्या गुंडांनी दोन तरुणांना चाकू भोसकला. ही मर्डर केस आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. तसेच मृतक तरुणांचे कुटुंबिय मागतील तो वकील देण्याची तयारीसुद्धा आर. आर. पाटलांनी दाखवली.

मुलीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून मुंबईतल्या दोन तरुणांना जीव गमवावा लागला. ऐन तारुण्यात केनन आणि रुबेन यांची चाकूने भोसकून हत्या झाली आणि रस्तावर उभे असलेलं कुणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. 24 वर्षांचा केनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली. मुलीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून त्यांची हत्या झाली आणि मुंबईकर मूकदर्शक होऊन बघत होते. रुबेनचा सोमवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर केनानचा 11 दिवसांआधीच मृत्यू झाला.

अंधेरी भागातल्या अंबोली रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर केनन, रुबेन आणि त्यांचे पाच मित्र रात्री अकरा वाजता पान खान्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या जीतेंद्र राणा या मुलाने केननच्या मैत्रिणीची छेड काढली आणि यावरुन केनन आणि जीतेंद्र यांच्यात वाद झाला. या वादानंतर राणा तिथून गेला आणि थोड्या वेळातच आपल्या 20 मित्रांसोबत तो परत आला. त्यानंतर त्यांनी केनन आणि रुबेन यांची चाकू भोसकून हत्या केली.

मृत केननचे वडील वॅलेरियन सँन्टोज म्हणतात, या गुंडांना अशी मोकळीक का दिली गेलीय. त्यांच्याविरोधात काहीच कारवाई का होत नाही.मन हेलावून टाकणार्‍या या घटनेविरोधात सोशल नेटवर्किंग साईटवरसुद्धा तीव्र संताप व्यक्त होतोय. केनन आणि रुबेनच्या कुटुंबीयांचे अश्रू आता थांबलेत. पण संताप कायम आहे. आमच्या मुलांचं हौताम्य वाया जाणार नाही, यासाठी अधिकारी काय करणार, हा एकच प्रश्न हे कुटुंबीय विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2011 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close