S M L

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सोनिया गांधी गप्प का ? - अडवाणी

05 नोव्हेंबरभ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावर अडवाणींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता सोनिया गांधींना टार्गेट केलं. या सर्व मुद्यांवर सोनिया गांधी गप्प का आहेत असा सवाल अडवाणींनी केला. आज अडवाणींची जनचेतना यात्रा मुंबईतून गुजरातमध्ये रवाना झाली. महागाईनं त्रस्त जनतेला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आणण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी जनचेतना यात्रा काढली. या यात्रेचा भाजपला किती फायदा हे अजून स्पष्ट नसलं तरी परकीय बँकांमधील काळा पैसा भारत सरकारने ताब्यात घ्यावा यासाठी मात्र युपीए सरकारवर दबाव वाढवण्यात अडवाणी यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अडवाणी रोज नवनवे खुलासे करत आहेत. काळ्या पैशात अडकलेल्या राजकारण्यांची नावे उघड करणारी श्वेत पत्रिका जाहीर करण्याची मागणी करतानाच आता अडवाणींनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींवरच सरसंधान साधलं आहे. आधी पंतप्रधान आता सोनिया गांधी ज्या प्रमाणे अडवाणी टीका करतात त्यावरुन अधिवेशनात पोषक वातावरणात. एकूणच काय येत्या काळात भ्रष्टाचारासह काळ्या पैशाच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या अनेक छोट्या मोठ्या फेरी झडतील असंच दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2011 03:44 PM IST

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सोनिया गांधी गप्प का ? - अडवाणी

05 नोव्हेंबर

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावर अडवाणींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता सोनिया गांधींना टार्गेट केलं. या सर्व मुद्यांवर सोनिया गांधी गप्प का आहेत असा सवाल अडवाणींनी केला. आज अडवाणींची जनचेतना यात्रा मुंबईतून गुजरातमध्ये रवाना झाली.

महागाईनं त्रस्त जनतेला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आणण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी जनचेतना यात्रा काढली. या यात्रेचा भाजपला किती फायदा हे अजून स्पष्ट नसलं तरी परकीय बँकांमधील काळा पैसा भारत सरकारने ताब्यात घ्यावा यासाठी मात्र युपीए सरकारवर दबाव वाढवण्यात अडवाणी यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अडवाणी रोज नवनवे खुलासे करत आहेत.

काळ्या पैशात अडकलेल्या राजकारण्यांची नावे उघड करणारी श्वेत पत्रिका जाहीर करण्याची मागणी करतानाच आता अडवाणींनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींवरच सरसंधान साधलं आहे.

आधी पंतप्रधान आता सोनिया गांधी ज्या प्रमाणे अडवाणी टीका करतात त्यावरुन अधिवेशनात पोषक वातावरणात. एकूणच काय येत्या काळात भ्रष्टाचारासह काळ्या पैशाच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या अनेक छोट्या मोठ्या फेरी झडतील असंच दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2011 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close