S M L

पुण्यात लष्कराचा एस्कव्हेटर घसरून ट्रफिक जाम

05 नोव्हेंबरपुण्यातील एनडीए (NDA) अर्थात राष्ट्रीय संरक्षण ऍकेडमीतून सीएमई (CME) म्हणजे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगकडे निघालेला लष्कराचा एस्कव्हेटर घसरून पडल्याने चांदणी चौक परिसरात ट्रॅफिक जाम झालं. एनडीएमधून एका ट्रेलरवरून हा अवजड एस्कव्हेटर वाहून नेण्यात येत होता तेव्हा हा ट्रेलर नो एंट्रीमध्ये शिरला आणि कोथरूड डेपोकडून पिरंगुटकडे जाणारा बाईकस्वार या ट्रेलरपुढे आला. संभाव्य अपघात टाळण्याकरता ब्रेक दाबला गेला आणि एस्कव्हेटर ट्रेलरमधून पडला. मुंबईहुन बेंगलोरकडे जाणार्‍या एक्सप्रेस हायवेवर चांदनी चौकानजिक सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृष्य पहायला मिळालं. आता मिलिटरीची क्रेन मागवून हा एस्कव्हेटर हलवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2011 11:22 AM IST

पुण्यात लष्कराचा एस्कव्हेटर घसरून ट्रफिक जाम

05 नोव्हेंबर

पुण्यातील एनडीए (NDA) अर्थात राष्ट्रीय संरक्षण ऍकेडमीतून सीएमई (CME) म्हणजे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगकडे निघालेला लष्कराचा एस्कव्हेटर घसरून पडल्याने चांदणी चौक परिसरात ट्रॅफिक जाम झालं. एनडीएमधून एका ट्रेलरवरून हा अवजड एस्कव्हेटर वाहून नेण्यात येत होता तेव्हा हा ट्रेलर नो एंट्रीमध्ये शिरला आणि कोथरूड डेपोकडून पिरंगुटकडे जाणारा बाईकस्वार या ट्रेलरपुढे आला. संभाव्य अपघात टाळण्याकरता ब्रेक दाबला गेला आणि एस्कव्हेटर ट्रेलरमधून पडला. मुंबईहुन बेंगलोरकडे जाणार्‍या एक्सप्रेस हायवेवर चांदनी चौकानजिक सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृष्य पहायला मिळालं. आता मिलिटरीची क्रेन मागवून हा एस्कव्हेटर हलवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2011 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close