S M L

अजितदादांचे विठ्ठलाकडे राज्याच्या सुख-समृद्धीचं साकडं

06 नोव्हेंबरआषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलासुद्धा पंढरपुरात लाखो वारकर्‍यांनी गर्दी केली. पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी अजित पवारांनी विठ्ठलाकडे राज्यात सुख-समृद्धी नांदावी असं विठ्ठलाकडे साकडं घातलं. तर वारकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून यावेळी महापूजेचा मान मिळाला बीड जिल्ह्यातील दाम्पत्य निवृत्ती आणि मुक्ताबाई मुंडे यांना. हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 40 वर्षांपासून पंढरपूरची वारी करत आहे. कार्तिकी एकादशीच्या या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो वारकरी पोहोचले आहे. गेल्या दोन दिवासांपासून राज्यातल्या अनेक भागातून अनेक दिंड्यामधून जवळपास 3 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2011 08:08 PM IST

अजितदादांचे विठ्ठलाकडे राज्याच्या सुख-समृद्धीचं साकडं

06 नोव्हेंबर

आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलासुद्धा पंढरपुरात लाखो वारकर्‍यांनी गर्दी केली. पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी अजित पवारांनी विठ्ठलाकडे राज्यात सुख-समृद्धी नांदावी असं विठ्ठलाकडे साकडं घातलं. तर वारकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून यावेळी महापूजेचा मान मिळाला बीड जिल्ह्यातील दाम्पत्य निवृत्ती आणि मुक्ताबाई मुंडे यांना. हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 40 वर्षांपासून पंढरपूरची वारी करत आहे. कार्तिकी एकादशीच्या या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो वारकरी पोहोचले आहे. गेल्या दोन दिवासांपासून राज्यातल्या अनेक भागातून अनेक दिंड्यामधून जवळपास 3 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2011 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close