S M L

बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार

06 नोव्हेंबरएकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाल्या बद्दल बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांना कारणे दाखवा नोटीस कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार आली आहे. मराठी द्वेषापायी कर्नाटकचे नगर विकास मंत्री सुरेश कुमार यांनी ही नोटीस पाठवल्याचं बोललं जातंय. या नोटीशीला सात दिवसात महापौर, उपमहापौरांना उत्तर द्यायचं आहेत. दरम्यान, या आधीही 2005मध्ये विजय मोरे हे मराठी महापौर आणि मराठी उपमहापौर असताना तत्कालीन मुख्यमंत्री धरम सिंह यांनी महापालिका बरखास्त केलीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका बरखास्तीची नामुष्की महापालिकेवर ओढवू शकतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 10:14 AM IST

बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार

06 नोव्हेंबर

एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाल्या बद्दल बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांना कारणे दाखवा नोटीस कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार आली आहे. मराठी द्वेषापायी कर्नाटकचे नगर विकास मंत्री सुरेश कुमार यांनी ही नोटीस पाठवल्याचं बोललं जातंय. या नोटीशीला सात दिवसात महापौर, उपमहापौरांना उत्तर द्यायचं आहेत. दरम्यान, या आधीही 2005मध्ये विजय मोरे हे मराठी महापौर आणि मराठी उपमहापौर असताना तत्कालीन मुख्यमंत्री धरम सिंह यांनी महापालिका बरखास्त केलीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका बरखास्तीची नामुष्की महापालिकेवर ओढवू शकतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close