S M L

बॉडीबिल्डिंग स्पर्धेला आज सुरुवात

06 नोव्हेंबरक्रिकेटबरोबरच आज सगळ्यांना उत्सुकता आहे ती मिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या फायनलची. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा मुंबईत होत आहे. संध्याकाळी चार वाजता फायनल सुरु होणार आहे. सिरियाच्या एका बॉडीबिल्डरचावजन पडताळणी दरम्यान दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा प्रकार दुर्देवी असला तरी फायनलची उत्सुकता कमी झाली नाही. आज एकूण 9 वजनी गटात ही स्पर्धा रंगणार आहे. आणि 54 बॉडीबिल्डर आपलं कसब पणाला लावणार आहे. भारताचा सुहास खामकर कालच्या वजन आणि फिटनेस पडताळणी दरम्यान मुख्य स्पर्धेसाठी अपात्र ठरला. त्यामुळे भारतीय टीमला धक्का बसला. पण आता सगळ्यांचं लक्ष आशिष साखरकरवर असेल. बक्षीस समारंभासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 10:27 AM IST

बॉडीबिल्डिंग स्पर्धेला आज सुरुवात

06 नोव्हेंबर

क्रिकेटबरोबरच आज सगळ्यांना उत्सुकता आहे ती मिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या फायनलची. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा मुंबईत होत आहे. संध्याकाळी चार वाजता फायनल सुरु होणार आहे. सिरियाच्या एका बॉडीबिल्डरचावजन पडताळणी दरम्यान दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा प्रकार दुर्देवी असला तरी फायनलची उत्सुकता कमी झाली नाही. आज एकूण 9 वजनी गटात ही स्पर्धा रंगणार आहे. आणि 54 बॉडीबिल्डर आपलं कसब पणाला लावणार आहे. भारताचा सुहास खामकर कालच्या वजन आणि फिटनेस पडताळणी दरम्यान मुख्य स्पर्धेसाठी अपात्र ठरला. त्यामुळे भारतीय टीमला धक्का बसला. पण आता सगळ्यांचं लक्ष आशिष साखरकरवर असेल. बक्षीस समारंभासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close