S M L

जस्टीस फॉर किनन- रुबेन !

07 नोव्हेंबरमुंबईत आंबोली इथं भर दिवसा रुबेन आणि किनन या दोन तरुणांची हत्या करण्यात आली होती. आपल्या मैत्रिणीची छेड काढली म्हणून या तरुणांनी जितेंद्र राणा या गुंडाला विरोध केला होता. पण त्यांना चाकूने भर रस्त्यात भोसकून मारण्यात आलं. या घटनेनंतर रुबेन आणि किननच्या कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी रुबेन आणि किननच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी सोशल नेटवकीर्ंग साईटच्या माध्यमातून आता एक कॅम्पेन सुरु केलं आहे. किनन आणि रुबेनचा मित्र व्हॅलेंटाईन सिल्व्हेस्टर म्हणतो, अगर भीड मे खडा एक भी आदमी अगर मेरे दोस्तो की मदत करता तो वो बच जाते. ही एकच खंत रुबीन आणि केननच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सतावतेय. ही घटना घडत असताना लोकं अक्षरश: तमाशा बघत असल्यासारखी उभी होती.निल शहा म्हणतो, हमें ऊन दोनो की कुर्बानी बेकार नही जानी देनी है. त्यांनी जितेंद्र राणासारख्या गुंडाविरोधात दिलेला लढा स्मरणात राहावा आणि असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी रुबीन आणि केननच्या मित्रांनी केनन सँटोज नावानं एक मोहीम सुरु केली. पोस्टर आणि सोशल नेटवकीर्ंगच्या माध्यमातून रोड रोमिओ आणि गुंडाच्या विरोधात किनन आणि रुबेनच्या मित्रांनी युवा सत्ता नावाने इंटरनेटवर कॅम्पेन सुरु केलं आहे. तब्बल 50 हजार पेक्षा जास्त लोकांनी युवा सत्ता या वेबपेजवर या घटनेचा निषेध केला. ज्यावेळी रुबेन आणि किननला मारहाण होत होती, त्यावेळी एक जरी व्यक्ती त्यांच्या मदतीला धावली असती तर त्यांचा जीव वाचला असता.वडिलाला मुलाचा मृत्यू बघावं लागणं, हे सर्वात मोठं दु:ख असतं असं म्हणतात. किनन आणि रुबेन तर गेले. पण इतर कुणावर ही वेळ येऊ नये, याची जबाबदारी समाज म्हणून आपलीसुद्धा आहे.दरम्यान, आंबोलीमध्ये हत्या झालेल्या किनन सँटोस, रुबेन फर्नांडिसला न्याय मिळावा यासाठी मुंबईकर काल रविवारी उत्सफूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. यासाठी अंधेरी रेल्वेस्टेशनपासून आंबोलीपर्यंत एक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांचीही मोठी संख्या होती. तसेच यावेळी सह्यांची मोहीमही राबण्यात आली. आंबोलीला पोचल्यावर केनन आणि रुबेनला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि अत्याचार सहन न करण्याची शपथही घेण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 11:40 AM IST

जस्टीस फॉर किनन- रुबेन !

07 नोव्हेंबर

मुंबईत आंबोली इथं भर दिवसा रुबेन आणि किनन या दोन तरुणांची हत्या करण्यात आली होती. आपल्या मैत्रिणीची छेड काढली म्हणून या तरुणांनी जितेंद्र राणा या गुंडाला विरोध केला होता. पण त्यांना चाकूने भर रस्त्यात भोसकून मारण्यात आलं. या घटनेनंतर रुबेन आणि किननच्या कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी रुबेन आणि किननच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी सोशल नेटवकीर्ंग साईटच्या माध्यमातून आता एक कॅम्पेन सुरु केलं आहे.

किनन आणि रुबेनचा मित्र व्हॅलेंटाईन सिल्व्हेस्टर म्हणतो, अगर भीड मे खडा एक भी आदमी अगर मेरे दोस्तो की मदत करता तो वो बच जाते. ही एकच खंत रुबीन आणि केननच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सतावतेय. ही घटना घडत असताना लोकं अक्षरश: तमाशा बघत असल्यासारखी उभी होती.

निल शहा म्हणतो, हमें ऊन दोनो की कुर्बानी बेकार नही जानी देनी है. त्यांनी जितेंद्र राणासारख्या गुंडाविरोधात दिलेला लढा स्मरणात राहावा आणि असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी रुबीन आणि केननच्या मित्रांनी केनन सँटोज नावानं एक मोहीम सुरु केली.

पोस्टर आणि सोशल नेटवकीर्ंगच्या माध्यमातून रोड रोमिओ आणि गुंडाच्या विरोधात किनन आणि रुबेनच्या मित्रांनी युवा सत्ता नावाने इंटरनेटवर कॅम्पेन सुरु केलं आहे. तब्बल 50 हजार पेक्षा जास्त लोकांनी युवा सत्ता या वेबपेजवर या घटनेचा निषेध केला. ज्यावेळी रुबेन आणि किननला मारहाण होत होती, त्यावेळी एक जरी व्यक्ती त्यांच्या मदतीला धावली असती तर त्यांचा जीव वाचला असता.

वडिलाला मुलाचा मृत्यू बघावं लागणं, हे सर्वात मोठं दु:ख असतं असं म्हणतात. किनन आणि रुबेन तर गेले. पण इतर कुणावर ही वेळ येऊ नये, याची जबाबदारी समाज म्हणून आपलीसुद्धा आहे.

दरम्यान, आंबोलीमध्ये हत्या झालेल्या किनन सँटोस, रुबेन फर्नांडिसला न्याय मिळावा यासाठी मुंबईकर काल रविवारी उत्सफूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. यासाठी अंधेरी रेल्वेस्टेशनपासून आंबोलीपर्यंत एक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांचीही मोठी संख्या होती. तसेच यावेळी सह्यांची मोहीमही राबण्यात आली. आंबोलीला पोचल्यावर केनन आणि रुबेनला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि अत्याचार सहन न करण्याची शपथही घेण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close