S M L

भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड

07 नोव्हेंबरनगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे चिपळूण येथील संपर्क कार्यालयाची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. गेल्या काही दिवसांपासून कोकणात राणे विरुध्द जाधव असा वाद सुरू आहे. अलीकडेच राणे यांनी ठिक-ठिकाणी सभा घेतल्या होत्या यावेळी राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली होती. यानंतर जाधव यांनी सभा घेऊन राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर देत कोंबडी चोर असा टोला लगावला होता. तर दुसरीकडे राणेंना घरचा आहेर देत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी राणेंच्या विरोधात जाहीर सभा घेऊन टाकली. आज भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ला हा याचं वादातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. दरम्यान भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी कार्यालयाच्या तोडफोडीच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको केला. हल्ला करणार्‍यांना अटक करण्यात यावी अशी मागणी समर्थकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 12:03 PM IST

भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड

07 नोव्हेंबर

नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे चिपळूण येथील संपर्क कार्यालयाची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. गेल्या काही दिवसांपासून कोकणात राणे विरुध्द जाधव असा वाद सुरू आहे. अलीकडेच राणे यांनी ठिक-ठिकाणी सभा घेतल्या होत्या यावेळी राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली होती. यानंतर जाधव यांनी सभा घेऊन राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर देत कोंबडी चोर असा टोला लगावला होता. तर दुसरीकडे राणेंना घरचा आहेर देत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी राणेंच्या विरोधात जाहीर सभा घेऊन टाकली. आज भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ला हा याचं वादातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. दरम्यान भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी कार्यालयाच्या तोडफोडीच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको केला. हल्ला करणार्‍यांना अटक करण्यात यावी अशी मागणी समर्थकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close