S M L

अल सामी ठरला 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन'

06 नोव्हेंबरमिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये बाहरीनच्या अल हदाद सामीनं चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा खिताब पटकावला. 90 किलो वजनी गटात सामी मिस्टर युनिव्हर्सबरोबरच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला. त्याला शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या हस्ते खिताब देण्यात आला. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनीही दमदार कामगिरी केली. 65 किलो वजनी गटात भारताच्या हिरालालने मिस्टर युनिव्हर्सचा खिताब पटकावला. तब्बल 22 वर्षांनंतर भारतीय बॉडीबिल्डर मिस्टर युनिव्हर्स ठरला. 60 किलो वजनी गटात एस के मुश्ताकनं ब्राँझ मेडल आणि 70 किलो वजनी गटात महेश्वरननं सिल्व्हर मेडलची कमाई केली. पण भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष होतं ते 75 किलो वजनी गटाकडे. महाराष्ट्राचा आशिष साखरकरचा या गटात समावेश होता. पण त्याला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 04:33 PM IST

अल सामी ठरला 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन'

06 नोव्हेंबर

मिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये बाहरीनच्या अल हदाद सामीनं चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा खिताब पटकावला. 90 किलो वजनी गटात सामी मिस्टर युनिव्हर्सबरोबरच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला. त्याला शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या हस्ते खिताब देण्यात आला. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनीही दमदार कामगिरी केली. 65 किलो वजनी गटात भारताच्या हिरालालने मिस्टर युनिव्हर्सचा खिताब पटकावला. तब्बल 22 वर्षांनंतर भारतीय बॉडीबिल्डर मिस्टर युनिव्हर्स ठरला. 60 किलो वजनी गटात एस के मुश्ताकनं ब्राँझ मेडल आणि 70 किलो वजनी गटात महेश्वरननं सिल्व्हर मेडलची कमाई केली. पण भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष होतं ते 75 किलो वजनी गटाकडे. महाराष्ट्राचा आशिष साखरकरचा या गटात समावेश होता. पण त्याला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close