S M L

टगेगिरीला गांधीगिरीने उत्तर देऊ - राजू शेट्टी

07 नोव्हेंबर'साहेब मी तुमच्या गावात शेतकर्‍यांची कैफियत घेऊन आलो आहे, शेतकर्‍यांच्या न्यायासाठी टगेगिरीला आता गांधीगिरीने उत्तर देण्याचं आम्ही ठरवलं आहे' यासाठी बेमुदत उपोषण करणार अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळावा असं साकडं विठ्ठलाकडे घालत निघालेली पदयात्रा आज बारामतीला धडकली. शारदा प्रांगणात शेट्टींची जाहीर सभा होतं आहे. या सभेला जवळपास 15 हजार शेतकर्‍यांनी हजेरी लावली. ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिला हप्ता 2,350 रुपये देण्यात यावा यासाठी एल्गार केला. राज्यभरातील शेतकर्‍यांनी संघटनेला पाठिंबा दिला. यासाठी तिन्ही शेतकरी संघटना एका छताखाली ऐऊन ऊस दरवाढीसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीला थेट पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली ही पदयात्रा आज बारामतीत धडकली. या पदयात्रेत शेतकर्‍यांनी मोठ्यासंख्येनं सहभाग घेतला. बारामतीच्या शारदा प्रांगणात जमलेल्या शेतकर्‍यांची काही वेळात जाहीर सभेत रुपांतर झालं. राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना साहेब असं म्हणतं भाषणाला सुरूवात केली. साहेब मी तुमच्या गावात आलो, माझ्यासोबत जमलेल्या शेतकर्‍यांची कैफियत मांडण्यासाठी इथं आलो आहे. पण आम्हाला टगेगिरीची भाष समजतं नाही. त्याला आम्ही गांधीगिरीने उत्तर देऊ यासाठी आम्ही बेमुदत उपोषण करू अशी घोषणाच शेट्टी यांनी केली. शेतकर्‍यांना साहेबांनी योग्य न्याय द्यावा अशी आमची एकच मागणी आहे जोपर्यंत ऊसाला 2,350 रुपये हप्ता मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या अगोदर टगेगिरीने प्रश्न सुटत नाहीत तर ते चर्चेने सुटतात असा टोला राजू शेट्टी यांनी अजित पवारांना लगावला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 01:53 PM IST

टगेगिरीला गांधीगिरीने उत्तर देऊ - राजू शेट्टी

07 नोव्हेंबर

'साहेब मी तुमच्या गावात शेतकर्‍यांची कैफियत घेऊन आलो आहे, शेतकर्‍यांच्या न्यायासाठी टगेगिरीला आता गांधीगिरीने उत्तर देण्याचं आम्ही ठरवलं आहे' यासाठी बेमुदत उपोषण करणार अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळावा असं साकडं विठ्ठलाकडे घालत निघालेली पदयात्रा आज बारामतीला धडकली. शारदा प्रांगणात शेट्टींची जाहीर सभा होतं आहे. या सभेला जवळपास 15 हजार शेतकर्‍यांनी हजेरी लावली.

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिला हप्ता 2,350 रुपये देण्यात यावा यासाठी एल्गार केला. राज्यभरातील शेतकर्‍यांनी संघटनेला पाठिंबा दिला. यासाठी तिन्ही शेतकरी संघटना एका छताखाली ऐऊन ऊस दरवाढीसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीला थेट पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली ही पदयात्रा आज बारामतीत धडकली. या पदयात्रेत शेतकर्‍यांनी मोठ्यासंख्येनं सहभाग घेतला. बारामतीच्या शारदा प्रांगणात जमलेल्या शेतकर्‍यांची काही वेळात जाहीर सभेत रुपांतर झालं. राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना साहेब असं म्हणतं भाषणाला सुरूवात केली. साहेब मी तुमच्या गावात आलो, माझ्यासोबत जमलेल्या शेतकर्‍यांची कैफियत मांडण्यासाठी इथं आलो आहे. पण आम्हाला टगेगिरीची भाष समजतं नाही. त्याला आम्ही गांधीगिरीने उत्तर देऊ यासाठी आम्ही बेमुदत उपोषण करू अशी घोषणाच शेट्टी यांनी केली. शेतकर्‍यांना साहेबांनी योग्य न्याय द्यावा अशी आमची एकच मागणी आहे जोपर्यंत ऊसाला 2,350 रुपये हप्ता मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या अगोदर टगेगिरीने प्रश्न सुटत नाहीत तर ते चर्चेने सुटतात असा टोला राजू शेट्टी यांनी अजित पवारांना लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close