S M L

महायुतीतून रिपाईच्या वाटयाला 22 जागा

07 नोव्हेंबरमुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. याचसंदर्भात शिवशक्ती आणि भीमशक्ती जागावाटपाच्या बैठकीची पहिली फेरी आज पार पडली. शिवाजी पार्क येथे महापौर निवासस्थळी ही बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 22 जागा देण्यात आल्या आहे. तर अजूनही 8 ते 10 जागांवर रिपाईचा दावा आहे अशी माहिती मिळत आहे. तर पुढील बैठकांमध्ये रिपाईला अजून 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता दिसतं आहे. यानंतर महत्वाच्या जागांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि गोपिनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांच्यात बैठक होणार आहे. आणि याबैठकीनंतरचं शेवटचे जागांचे आकडे समोर येणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 02:50 PM IST

महायुतीतून रिपाईच्या वाटयाला 22 जागा

07 नोव्हेंबर

मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. याचसंदर्भात शिवशक्ती आणि भीमशक्ती जागावाटपाच्या बैठकीची पहिली फेरी आज पार पडली. शिवाजी पार्क येथे महापौर निवासस्थळी ही बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 22 जागा देण्यात आल्या आहे. तर अजूनही 8 ते 10 जागांवर रिपाईचा दावा आहे अशी माहिती मिळत आहे. तर पुढील बैठकांमध्ये रिपाईला अजून 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता दिसतं आहे. यानंतर महत्वाच्या जागांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि गोपिनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांच्यात बैठक होणार आहे. आणि याबैठकीनंतरचं शेवटचे जागांचे आकडे समोर येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close