S M L

भारताची पहिली इंनिग 209 रन्सवर जमा

07 नोव्हेंबरदिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान पहिली टेस्ट मॅचमध्ये घरच्या मैदानावर खेळणार्‍या भारताची पहिली इनिंग अवघ्या 209 रन्सवर ऑलआऊट झाली. विंडीजने पहिल्या इनिंगमध्ये 95 रन्सची आघाडी घेतली आहेत. चांगल्या सुरुवातीनंतरही विंडीजच्या भेदक बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही. वेस्टइंडिजची पहिली इनिंग 304 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागने 89 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली. पण गंभीर 41 रन्सवर आऊट झाला आणि पाठोपाठ सेहवागही 55 रन्सकरुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. यानंतर राहुल द्रविडचा अपवाद वगळता इतर भारतीय बॅट्समनने मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं काम केलं. सचिन तेंडुलकर 7 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे सेंच्युरीच्या सेंच्युरीची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडलीय. कॅप्टन धोणी आणि आर अश्विनला तर भोपळाही फोडता आला नाही. पण राहुल द्रविडने खंबीरपणे उभं राहत भारताला किमान 200 रन्सचा टप्पा पार करुन दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 11:12 AM IST

भारताची पहिली इंनिग 209 रन्सवर जमा

07 नोव्हेंबर

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान पहिली टेस्ट मॅचमध्ये घरच्या मैदानावर खेळणार्‍या भारताची पहिली इनिंग अवघ्या 209 रन्सवर ऑलआऊट झाली. विंडीजने पहिल्या इनिंगमध्ये 95 रन्सची आघाडी घेतली आहेत. चांगल्या सुरुवातीनंतरही विंडीजच्या भेदक बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.

वेस्टइंडिजची पहिली इनिंग 304 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागने 89 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली. पण गंभीर 41 रन्सवर आऊट झाला आणि पाठोपाठ सेहवागही 55 रन्सकरुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. यानंतर राहुल द्रविडचा अपवाद वगळता इतर भारतीय बॅट्समनने मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं काम केलं. सचिन तेंडुलकर 7 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे सेंच्युरीच्या सेंच्युरीची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडलीय. कॅप्टन धोणी आणि आर अश्विनला तर भोपळाही फोडता आला नाही. पण राहुल द्रविडने खंबीरपणे उभं राहत भारताला किमान 200 रन्सचा टप्पा पार करुन दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close