S M L

रेल्वेवर दगड मारल्यामुळे महिलेचा डोळा गेला

08 नोव्हेंबरमुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. चालत्या रेल्वेवर दगड मारल्याने पुन्हा एका महिला प्रवाशावर डोळा गमवायची वेळ आली. दर्शना खानपेकर असं या महिलेचं नाव आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना विक्रोळी दरम्यान दर्शनावर अज्ञात व्यक्तीने दगड मारला. यामुळे दर्शनाला आपला डोळा गमवावा लागला. हा दगड दर्शनाला इतका जोरात लागलाय की दर्शनाच्या डोक्यालाही यामुळे मोठी जखम झाली. चालत्या लोकलमध्ये प्रवाशांवर दगड मारण्याची गेल्या 4 महिन्यातील ही पाचवी घटना आहे. ठाण्यातल्या संपदा रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत. दर्शनाच्या घरची परिस्थिती गरीब आहे त्यातच आता तिला आलेलेल्या अंपगत्वामुळे जगायचं कसं हा प्रश्न पडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 11:01 AM IST

रेल्वेवर दगड मारल्यामुळे महिलेचा डोळा गेला

08 नोव्हेंबर

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. चालत्या रेल्वेवर दगड मारल्याने पुन्हा एका महिला प्रवाशावर डोळा गमवायची वेळ आली. दर्शना खानपेकर असं या महिलेचं नाव आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना विक्रोळी दरम्यान दर्शनावर अज्ञात व्यक्तीने दगड मारला. यामुळे दर्शनाला आपला डोळा गमवावा लागला. हा दगड दर्शनाला इतका जोरात लागलाय की दर्शनाच्या डोक्यालाही यामुळे मोठी जखम झाली. चालत्या लोकलमध्ये प्रवाशांवर दगड मारण्याची गेल्या 4 महिन्यातील ही पाचवी घटना आहे. ठाण्यातल्या संपदा रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत. दर्शनाच्या घरची परिस्थिती गरीब आहे त्यातच आता तिला आलेलेल्या अंपगत्वामुळे जगायचं कसं हा प्रश्न पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close