S M L

सचिन द ग्रेट ; 15,000 धावांचा रेकॉर्ड !

08 नोव्हेंबरमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीच्या सेंच्युरीची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलीच आहे पण त्याआधी सचिन तेंडुलकरने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनने 15 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. 182 टेस्ट मॅचमध्य त्याने 15 हजार रन्स पूर्ण केले आहे. यात तब्बल 51 सेंच्युरीचा समावेश आहे. वेस्टइंडिजविरुध्दच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 28 रन्स पूर्ण करत त्याने या रेकॉर्डला गवसणी घातली. पहिल्या इनिंगमध्ये सचिनला फक्त 7 रन्स करता आले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक सेंच्युरी सचिनच्या नावावर आहेत. आणि भविष्यात हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यताही फार कमी आहे. आता क्रिकेटप्रेंमीचं लक्ष लागलंय ते सचिनच्या सेंच्युरीच्या सेंच्युरीवर. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सचिन इतिहास रचणार का याची उत्सुकता क्रिकेटप्रेंमीना आहे.सचिननं टेस्ट क्रिकेटमध्ये 15 हजार रन्सचा टप्पा पूर्ण तर केलाच आहे पण दिल्ली टेस्टमध्ये विजायाची संधीही मिळवून दिली. दिल्ली टेस्टमध्ये वेस्टइंडिजनं भारतासमोर 276 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे आणि याला उत्तर देताना भारताने तिसर्‍या दिवसअखेर 2 विकेट गमावत 152 रन्स केले आहेत. विजयासाठी आता भारताला 124 रन्सची गरज आहे. सचिन तेंडुलकर 33 तर द्रविड 30 रन्सवर नॉटआऊट आहे. त्याआधी भारताच्या स्पीन बॉलिंगसमोर विंडीजची दुसरी इनिंग अवघ्या 180 रन्सवर ऑलआऊट झाली. चंद्रपॉलने दुसर्‍या इनिंगमध्ये सर्वाधिक 47 रन्स केले. तर तळाच्या डेरेन सॅमीने 42 रन्स करत इनिंग लांबवली. पण अश्विनन त्याची विकेट घेत विंडीजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. दुसर्‍या इनिंगमध्ये आर अश्विननं सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर उमेश यादवनं 2 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 11:32 AM IST

सचिन द ग्रेट ; 15,000 धावांचा रेकॉर्ड !

08 नोव्हेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीच्या सेंच्युरीची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलीच आहे पण त्याआधी सचिन तेंडुलकरने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनने 15 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. 182 टेस्ट मॅचमध्य त्याने 15 हजार रन्स पूर्ण केले आहे. यात तब्बल 51 सेंच्युरीचा समावेश आहे. वेस्टइंडिजविरुध्दच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 28 रन्स पूर्ण करत त्याने या रेकॉर्डला गवसणी घातली. पहिल्या इनिंगमध्ये सचिनला फक्त 7 रन्स करता आले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक सेंच्युरी सचिनच्या नावावर आहेत. आणि भविष्यात हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यताही फार कमी आहे. आता क्रिकेटप्रेंमीचं लक्ष लागलंय ते सचिनच्या सेंच्युरीच्या सेंच्युरीवर. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सचिन इतिहास रचणार का याची उत्सुकता क्रिकेटप्रेंमीना आहे.

सचिननं टेस्ट क्रिकेटमध्ये 15 हजार रन्सचा टप्पा पूर्ण तर केलाच आहे पण दिल्ली टेस्टमध्ये विजायाची संधीही मिळवून दिली. दिल्ली टेस्टमध्ये वेस्टइंडिजनं भारतासमोर 276 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे आणि याला उत्तर देताना भारताने तिसर्‍या दिवसअखेर 2 विकेट गमावत 152 रन्स केले आहेत. विजयासाठी आता भारताला 124 रन्सची गरज आहे. सचिन तेंडुलकर 33 तर द्रविड 30 रन्सवर नॉटआऊट आहे. त्याआधी भारताच्या स्पीन बॉलिंगसमोर विंडीजची दुसरी इनिंग अवघ्या 180 रन्सवर ऑलआऊट झाली. चंद्रपॉलने दुसर्‍या इनिंगमध्ये सर्वाधिक 47 रन्स केले. तर तळाच्या डेरेन सॅमीने 42 रन्स करत इनिंग लांबवली. पण अश्विनन त्याची विकेट घेत विंडीजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. दुसर्‍या इनिंगमध्ये आर अश्विननं सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर उमेश यादवनं 2 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close