S M L

मॅच जिंकली पण सचिनची सेंच्युरी हुकली

09 नोव्हेंबरदिल्ली टेस्टमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची सेंच्युरी हुकली. पण भारतीय टीमने मात्र चौथ्या दिवशीच टेस्ट मॅच खिशात घातली. विंडीजचा भारताने 5 विकेटने पराभव केला. चौथ्या दिवशी भारतीय टीमला विजयासाठी 124 रनची गरज होती. राहुल द्रविड आज 31 रनवर झटपट आऊट झाला. पण सचिनने अर्ध्या तासातच आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. लक्ष्मणसह त्याने रन्सचा वेगही वाढवला. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीची उत्सुकता वाढली होती. पण बिशूच्या बॉलिंगवर पूलचा त्याचा शॉट चुकला. आणि तो चक्क एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याने 76 रन केले. सचिन आऊट झाल्यावर लक्ष्मण आणि युवराजने टीमला विजयाच्या उंबरठयावर आणून ठेवलं. पण विजयाासाठी एक रन्स असताना युवराज आऊट झाला. पण लक्ष्मणने विजयी रन घेत औपचारिकता पूर्ण केली. या विजयाबरोबरच भारतीय टीमने सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतली. आता दुसरी टेस्ट सोमवारपासून कोलकात्याला रंगणार आहे. भारतीय टीमने विंडीजचा पाच विकेटने पराभव केला. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समन समाधानकारक कामगिरी करु शकले नाहीत. पण दुसर्‍या इनिंगमध्ये बॅट्समननं लौकीकाला साजेशी कामगिरी केली. पण या विजयात सर्वात महत्वाचा वाटा होता तो भारतीय बॉलर्सचा. ओपनर वीरेंद्र सेहवागने धडाकेबाज बॅटिंग करत 55 रन्स केले. विशेष म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये सेहवागनं 55 रन्सच केले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची रेकॉर्डब्रेक सेंच्युरी हुकली असली तरी त्याने 76 रन्सची मॅच विनिंग कामगिरी केली. शिवाय या मॅचमध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 15 हजार रन्सचा टप्पाही पार केला. 'व्हेरी व्हेरी स्पेशल' लक्ष्मणने नॉटआऊट 58 रन्स करत भारतीय टीमला शानदार विजय मिळवून दिला. पण त्याआधी भारतीय युवा बॉलर्सनं कमाल केली. स्पीन बॉलर आर अश्विनने दुसर्‍या इनिंगमध्ये 6 विकेट घेत विंडीजची इनिंग गुंडाळली. या मॅचमध्ये अश्विनने एकुण 9 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2011 09:56 AM IST

मॅच जिंकली पण सचिनची सेंच्युरी हुकली

09 नोव्हेंबर

दिल्ली टेस्टमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची सेंच्युरी हुकली. पण भारतीय टीमने मात्र चौथ्या दिवशीच टेस्ट मॅच खिशात घातली. विंडीजचा भारताने 5 विकेटने पराभव केला. चौथ्या दिवशी भारतीय टीमला विजयासाठी 124 रनची गरज होती. राहुल द्रविड आज 31 रनवर झटपट आऊट झाला. पण सचिनने अर्ध्या तासातच आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

लक्ष्मणसह त्याने रन्सचा वेगही वाढवला. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीची उत्सुकता वाढली होती. पण बिशूच्या बॉलिंगवर पूलचा त्याचा शॉट चुकला. आणि तो चक्क एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याने 76 रन केले. सचिन आऊट झाल्यावर लक्ष्मण आणि युवराजने टीमला विजयाच्या उंबरठयावर आणून ठेवलं. पण विजयाासाठी एक रन्स असताना युवराज आऊट झाला.

पण लक्ष्मणने विजयी रन घेत औपचारिकता पूर्ण केली. या विजयाबरोबरच भारतीय टीमने सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतली. आता दुसरी टेस्ट सोमवारपासून कोलकात्याला रंगणार आहे.

भारतीय टीमने विंडीजचा पाच विकेटने पराभव केला. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समन समाधानकारक कामगिरी करु शकले नाहीत. पण दुसर्‍या इनिंगमध्ये बॅट्समननं लौकीकाला साजेशी कामगिरी केली. पण या विजयात सर्वात महत्वाचा वाटा होता तो भारतीय बॉलर्सचा. ओपनर वीरेंद्र सेहवागने धडाकेबाज बॅटिंग करत 55 रन्स केले.

विशेष म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये सेहवागनं 55 रन्सच केले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची रेकॉर्डब्रेक सेंच्युरी हुकली असली तरी त्याने 76 रन्सची मॅच विनिंग कामगिरी केली. शिवाय या मॅचमध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 15 हजार रन्सचा टप्पाही पार केला. 'व्हेरी व्हेरी स्पेशल' लक्ष्मणने नॉटआऊट 58 रन्स करत भारतीय टीमला शानदार विजय मिळवून दिला.

पण त्याआधी भारतीय युवा बॉलर्सनं कमाल केली. स्पीन बॉलर आर अश्विनने दुसर्‍या इनिंगमध्ये 6 विकेट घेत विंडीजची इनिंग गुंडाळली. या मॅचमध्ये अश्विनने एकुण 9 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2011 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close