S M L

मणिपूर वेदनेच्या खाईत !

09 नोव्हेंबरमणिपूरमध्ये आर्थिक नाकाबंदीला आज 100 दिवस पूर्ण होत आहे. आदिवासींमधला संघर्ष आणि केंद्राचे राजकारण यात सामान्य माणूस भरडला जात आहे. नाकाबंदीमुळे औषधांची तीव्र टंचाई निर्माण झालीय. आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सिजा हॉस्पिटलचे सर्जन म्हणतात, आणखी एका दिवसानंतर आम्ही आरोग्य सेवा सुरू ठेवू शकू का हे आम्हाला माहीत नाही.मणिपूरमधल्या सर्वात मोठ्या खासगी हॉस्पिटलचे सुपरिटेंडंट असलेले 49 वर्षांचे जोगेंद्र सध्या त्यांच्या मेडिकल करिअरमधल्या खडतर काळाचा सामना करत आहे. ते नियमित राऊंडवर जातात, रुग्णांची तपासणी करतात, पण जड अंतःकरणाने. मणिपूरमधल्या इतर अनेक हॉस्पिटलप्रमाणेच सिजा हॉस्पिटलमध्येही वैद्यकीय साधनांचा तुटवडा आहे. कारण आहे मणिपूरमधली आर्थिक नाकाबंदी...हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, औषधं संपली आहेत. ती यायला अनेक आठवडे लागतात.औषध कंपन्यांनी औषधपुरवठा बंद केला आहे. औषधं मागवण्यासाठी हॉस्पिटल्सना खासगी वाहनं पाठवावी लागत आहे. पण ही वाहनं परत येतील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक हॉस्पिटल्सनी तर नव्या रुग्णांना ऍडमिट करून घेणं थांबवलं आहे. कारण उरलंसुरलं ऑक्सिजन अगोदरच ऍडमिट असलेल्या रुग्णांसाठी वापरायचं आहे. थोईबाचा भाऊ आयसीयू (ICU) मध्ये आहे. उद्या काय होणार, या काळजीनं तो हैराण आहे.थोईब म्हणतो, उद्या काय होईल या चिंतेनं मी हैराण आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. काहीही असो जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला परवानगी द्यायला हवी.काही लोकांचा अनुभव यापेक्षा अधिक वाईट आहे. 50 वर्षांच्या एम गांम्बिंग यांच्या 20 वर्षांच्या मुलीचं दुसर्‍यांदा ऑपरेशन व्हायचं आहे. पण, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हीच मोठी जोखिम आहे. हॉस्पिटल फक्त 15 किमी अंतरावर आहे. पण ऍम्ब्युलन्ससाठी तिप्पट पैसे मोजावे लागतायत. सर्व काही महागलंय. औषधं खूप महाग आहेत. याचं कसं नियोजन करायचं आम्हाला माहीत नाही.आपल्याला योग्य वैद्यकीय सेवा मिळाव्यात आणि मोकळा श्वास घेता यावा, अशी प्रार्थना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत.तिढा मणिपूरचा - कुकीबहुल सदर हिल्सचा स्वतंत्र जिल्हा करावा, कुकी आदिवासांची मागणी- सध्या सदर हिल्स नागाबहुल सेनापती जिल्ह्याचा भाग- 1 ऑगस्ट 2011 - कुकी आदिवासींनी नाकाबंदी सुरू केली- कुकींच्या मागणीला युनायटेड नागा कमिटीचा विरोध- नागा आदिवासींनीही चक्काजाम आंदोलन सुरू केलं - 92 दिवसांच्या नाकाबंदीनंतर केंद्र सरकारचा हस्तक्षेप - कुकींच्या मागणीचा विचार करण्याची केंद्राची तयारी - चिडलेल्या नागांनी आंदोलन तीव्र केलं

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 04:42 PM IST

मणिपूर वेदनेच्या खाईत !

09 नोव्हेंबर

मणिपूरमध्ये आर्थिक नाकाबंदीला आज 100 दिवस पूर्ण होत आहे. आदिवासींमधला संघर्ष आणि केंद्राचे राजकारण यात सामान्य माणूस भरडला जात आहे. नाकाबंदीमुळे औषधांची तीव्र टंचाई निर्माण झालीय. आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सिजा हॉस्पिटलचे सर्जन म्हणतात, आणखी एका दिवसानंतर आम्ही आरोग्य सेवा सुरू ठेवू शकू का हे आम्हाला माहीत नाही.

मणिपूरमधल्या सर्वात मोठ्या खासगी हॉस्पिटलचे सुपरिटेंडंट असलेले 49 वर्षांचे जोगेंद्र सध्या त्यांच्या मेडिकल करिअरमधल्या खडतर काळाचा सामना करत आहे. ते नियमित राऊंडवर जातात, रुग्णांची तपासणी करतात, पण जड अंतःकरणाने. मणिपूरमधल्या इतर अनेक हॉस्पिटलप्रमाणेच सिजा हॉस्पिटलमध्येही वैद्यकीय साधनांचा तुटवडा आहे. कारण आहे मणिपूरमधली आर्थिक नाकाबंदी...हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, औषधं संपली आहेत. ती यायला अनेक आठवडे लागतात.

औषध कंपन्यांनी औषधपुरवठा बंद केला आहे. औषधं मागवण्यासाठी हॉस्पिटल्सना खासगी वाहनं पाठवावी लागत आहे. पण ही वाहनं परत येतील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक हॉस्पिटल्सनी तर नव्या रुग्णांना ऍडमिट करून घेणं थांबवलं आहे. कारण उरलंसुरलं ऑक्सिजन अगोदरच ऍडमिट असलेल्या रुग्णांसाठी वापरायचं आहे. थोईबाचा भाऊ आयसीयू (ICU) मध्ये आहे. उद्या काय होणार, या काळजीनं तो हैराण आहे.

थोईब म्हणतो, उद्या काय होईल या चिंतेनं मी हैराण आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. काहीही असो जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला परवानगी द्यायला हवी.

काही लोकांचा अनुभव यापेक्षा अधिक वाईट आहे. 50 वर्षांच्या एम गांम्बिंग यांच्या 20 वर्षांच्या मुलीचं दुसर्‍यांदा ऑपरेशन व्हायचं आहे. पण, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हीच मोठी जोखिम आहे. हॉस्पिटल फक्त 15 किमी अंतरावर आहे. पण ऍम्ब्युलन्ससाठी तिप्पट पैसे मोजावे लागतायत. सर्व काही महागलंय. औषधं खूप महाग आहेत. याचं कसं नियोजन करायचं आम्हाला माहीत नाही.आपल्याला योग्य वैद्यकीय सेवा मिळाव्यात आणि मोकळा श्वास घेता यावा, अशी प्रार्थना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत.

तिढा मणिपूरचा - कुकीबहुल सदर हिल्सचा स्वतंत्र जिल्हा करावा, कुकी आदिवासांची मागणी- सध्या सदर हिल्स नागाबहुल सेनापती जिल्ह्याचा भाग- 1 ऑगस्ट 2011 - कुकी आदिवासींनी नाकाबंदी सुरू केली- कुकींच्या मागणीला युनायटेड नागा कमिटीचा विरोध- नागा आदिवासींनीही चक्काजाम आंदोलन सुरू केलं - 92 दिवसांच्या नाकाबंदीनंतर केंद्र सरकारचा हस्तक्षेप - कुकींच्या मागणीचा विचार करण्याची केंद्राची तयारी - चिडलेल्या नागांनी आंदोलन तीव्र केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close