S M L

महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सव

09 नोव्हेंबरप्राचीन वास्तुकौशल्याचा अद्भुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी सुर्याची किरणं महालक्ष्मीच्या चरणापर्यंत येऊन पोहचली. संध्याकाळी सहा वाजून 1 मिनीटांनी ही सूर्यकिरणं गरुड मंडपातून गाभार्‍यात पोहचली आणि त्यानंतर महालक्ष्मीच्या चरणाजवळ येऊन लुप्तं झाली. हा सोहळा अनुभविण्यासाठी भक्तांनी महालक्ष्मी मंदिरात मोठी गर्दी केली होती. 9 ते 11 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी 1 आणि 2 फेब्रुवारी असे वर्षातील सहा दिवस हा किरणोत्सवाचा सोहळा महालक्ष्मीमंदिरात पहायला मिळतो. त्यामुळे या काळात भक्त मोठ्या संख्येनं हा सोहळा पाहाण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात हजर रहातात.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2011 03:16 PM IST

महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सव

09 नोव्हेंबर

प्राचीन वास्तुकौशल्याचा अद्भुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी सुर्याची किरणं महालक्ष्मीच्या चरणापर्यंत येऊन पोहचली. संध्याकाळी सहा वाजून 1 मिनीटांनी ही सूर्यकिरणं गरुड मंडपातून गाभार्‍यात पोहचली आणि त्यानंतर महालक्ष्मीच्या चरणाजवळ येऊन लुप्तं झाली. हा सोहळा अनुभविण्यासाठी भक्तांनी महालक्ष्मी मंदिरात मोठी गर्दी केली होती. 9 ते 11 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी 1 आणि 2 फेब्रुवारी असे वर्षातील सहा दिवस हा किरणोत्सवाचा सोहळा महालक्ष्मीमंदिरात पहायला मिळतो. त्यामुळे या काळात भक्त मोठ्या संख्येनं हा सोहळा पाहाण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात हजर रहातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2011 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close