S M L

राज्यभरात ऊस आंदोलनाचा वणवा

10 नोव्हेंबरऊस प्रश्नावर राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. पण या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बारामती बंदचं आवाहन केलं आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामतीमध्ये आज आठवडी बाजाराचा दिवस आहे पण तरीही दुकानं बंद आहेत, आणि रस्त्यांवर तुरळक वाहतूक आहे. अजितदादांच्या गावी शिवसेनेचा रास्ता रोकोउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात शिवसेनेनं रास्तारोको केला. तसेच टायर्सची जाळपोळही करण्यात आली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर तालुकाही बंद आहे. तर पुणे सोलापूर हायवेवरच्या गलांडवाडीमध्ये शेतकर्‍यांच्या मुलांनी हर्षवर्धन पाटलांच्या पुतळ्याची होळी केली. तर तालुक्यामध्ये ठिकठिकणी रास्ता रोको आणि चक्का जामही करण्यात येतंय.पुणे-बंगळुरु हायवे ठप्पशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्ग अडवला होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, याच महामार्गावर सांगली जिल्ह्यातही वाघवाडी फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी आंदोलन केली जात आहेत.नाशकात मनसेचा रास्ता रोकोनाशिकमधल्या मनसेच्या तीनही आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक - पुणे हायवेवर रास्ता रोको केला. चेहडी जवळ हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मनसेचे आमदार वसंत गिते यांना अटक करण्यात आली. तर साडेचारशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिकसह निफाड, दिंडोरी अशा 5 ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पंढरपूर आणि माळशिरस इथे शेतकर्‍यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2011 09:30 AM IST

राज्यभरात ऊस आंदोलनाचा वणवा

10 नोव्हेंबर

ऊस प्रश्नावर राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. पण या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बारामती बंदचं आवाहन केलं आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामतीमध्ये आज आठवडी बाजाराचा दिवस आहे पण तरीही दुकानं बंद आहेत, आणि रस्त्यांवर तुरळक वाहतूक आहे. अजितदादांच्या गावी शिवसेनेचा रास्ता रोको

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात शिवसेनेनं रास्तारोको केला. तसेच टायर्सची जाळपोळही करण्यात आली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर तालुकाही बंद आहे. तर पुणे सोलापूर हायवेवरच्या गलांडवाडीमध्ये शेतकर्‍यांच्या मुलांनी हर्षवर्धन पाटलांच्या पुतळ्याची होळी केली. तर तालुक्यामध्ये ठिकठिकणी रास्ता रोको आणि चक्का जामही करण्यात येतंय.

पुणे-बंगळुरु हायवे ठप्प

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्ग अडवला होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, याच महामार्गावर सांगली जिल्ह्यातही वाघवाडी फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी आंदोलन केली जात आहेत.

नाशकात मनसेचा रास्ता रोको

नाशिकमधल्या मनसेच्या तीनही आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक - पुणे हायवेवर रास्ता रोको केला. चेहडी जवळ हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मनसेचे आमदार वसंत गिते यांना अटक करण्यात आली. तर साडेचारशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिकसह निफाड, दिंडोरी अशा 5 ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पंढरपूर आणि माळशिरस इथे शेतकर्‍यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2011 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close