S M L

मेळघाटात कुपोषणाचं दुष्टचक्र

अलका धुपकर, मेळघाट10 नोव्हेंबरमेळघाटामध्ये सरकारी व्यवस्था जशी अपुरी पडतेय, तसाचा नागरिकांचा प्रतिसादही कमी पडतोय. अंगणवाडीच्या माध्यमातून चालवली जाणारी एकात्मिक बालविकास केंद्र असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील बालविकास केंद्र असोत, आदिवासी नागरिक रोजगारांच्या चिंतेमध्ये या सुविधांचा लाभ घ्यायला टाळाटाळ करत आहे. चिखलदरा तालुक्यातल्या बोर्‍हाटाखेडा गावातील दोन वर्षांची संजना.. तिच्या मानेवर, पायावर, केसात खरुज उठले आहेत. ती सतत रडत असते. आणि आजारी असते. कुपोषणामुळे तिच्यात प्रतिकारशक्तीच उरली नाही. इथल्या अंगणवाडीत तिची काळजी घेतली जाईल पण कामाच्या नादात तिचे आईबाबा तिच्या कुपोषणाकडेच दुर्लक्ष करतात. बिहाली इथल्या शीलाच्या मुलीची कहाणी काही वेगळी नाही. मेळघाटात तब्बल 46 टक्के महिलांच्या डिलिव्हरी घरीच होतात. त्यामुळे गरोदरपणातली आणि जन्मजात बाळाची योग्य काळजीही घेतली जात नाही. आणि या सगळ्याची परिणीती अशी कुपोषणात दिसते.ज्या वयात बाळ सुदृढ असलं पाहिजे, तेव्हा अशी खुजलेली शरीरं असणारी मुलं हिरामुंबई गावातही दिसतात. रस्ते, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवा मेळघाटापर्यंत पोचल्याशिवाय हे कुपोषणाचे दुष्टचक्र थांबणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2011 12:37 PM IST

मेळघाटात कुपोषणाचं दुष्टचक्र

अलका धुपकर, मेळघाट

10 नोव्हेंबर

मेळघाटामध्ये सरकारी व्यवस्था जशी अपुरी पडतेय, तसाचा नागरिकांचा प्रतिसादही कमी पडतोय. अंगणवाडीच्या माध्यमातून चालवली जाणारी एकात्मिक बालविकास केंद्र असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील बालविकास केंद्र असोत, आदिवासी नागरिक रोजगारांच्या चिंतेमध्ये या सुविधांचा लाभ घ्यायला टाळाटाळ करत आहे.

चिखलदरा तालुक्यातल्या बोर्‍हाटाखेडा गावातील दोन वर्षांची संजना.. तिच्या मानेवर, पायावर, केसात खरुज उठले आहेत. ती सतत रडत असते. आणि आजारी असते. कुपोषणामुळे तिच्यात प्रतिकारशक्तीच उरली नाही. इथल्या अंगणवाडीत तिची काळजी घेतली जाईल पण कामाच्या नादात तिचे आईबाबा तिच्या कुपोषणाकडेच दुर्लक्ष करतात.

बिहाली इथल्या शीलाच्या मुलीची कहाणी काही वेगळी नाही. मेळघाटात तब्बल 46 टक्के महिलांच्या डिलिव्हरी घरीच होतात. त्यामुळे गरोदरपणातली आणि जन्मजात बाळाची योग्य काळजीही घेतली जात नाही. आणि या सगळ्याची परिणीती अशी कुपोषणात दिसते.

ज्या वयात बाळ सुदृढ असलं पाहिजे, तेव्हा अशी खुजलेली शरीरं असणारी मुलं हिरामुंबई गावातही दिसतात. रस्ते, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवा मेळघाटापर्यंत पोचल्याशिवाय हे कुपोषणाचे दुष्टचक्र थांबणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2011 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close