S M L

नागपूरमध्ये स्टार बसेसचे तीन तेरा

11 नोव्हेंबरनागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्टार बसेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. याबसमध्ये अनेक बसला काचा नाहीत. तर अनेक बस अत्यंत वाईट व्यवस्थेत रस्त्यावर धावत आहेत. या सर्व 200 बसेसच्या पार्किंगची अवस्था महापालिकेनं सोडवलेली नाही. त्यामुळे महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. केंद्र सरकारने नागपूरला 220 स्टार बसेस दिल्या होत्या. पण आज आठ महिने उलटून गेल्यावरही सर्व बसेस उभ्या आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता आहे. दोन वर्षापूर्वी शहर बस चालवण्याचे कंत्राट वंश इन्फ्रा या कंपनीला दिलं होतं. यात या कंपनीने 200 बसेस शहरात सुरू केल्या, पण केंद्र सरकारकडून आलेल्या या बसेस या कंपनीला चालवायला द्यायच्या आहेत. यासाठी 36 कोटी रूपये कंपनी मनपाला देणार आहे. महापालिका आणि कंपनीच्या वादात या सर्व बसेस गेल्या अनेक महिन्यापासून शहराबाहेर पडून आहेत. अनेक बसेसचे टायर्स चोरीला गेले आहेत तर बसेस उभ्या असलेल्या जागेवर झाडं वाढली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2011 04:52 PM IST

नागपूरमध्ये स्टार बसेसचे तीन तेरा

11 नोव्हेंबर

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्टार बसेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. याबसमध्ये अनेक बसला काचा नाहीत. तर अनेक बस अत्यंत वाईट व्यवस्थेत रस्त्यावर धावत आहेत. या सर्व 200 बसेसच्या पार्किंगची अवस्था महापालिकेनं सोडवलेली नाही. त्यामुळे महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

केंद्र सरकारने नागपूरला 220 स्टार बसेस दिल्या होत्या. पण आज आठ महिने उलटून गेल्यावरही सर्व बसेस उभ्या आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता आहे. दोन वर्षापूर्वी शहर बस चालवण्याचे कंत्राट वंश इन्फ्रा या कंपनीला दिलं होतं. यात या कंपनीने 200 बसेस शहरात सुरू केल्या, पण केंद्र सरकारकडून आलेल्या या बसेस या कंपनीला चालवायला द्यायच्या आहेत. यासाठी 36 कोटी रूपये कंपनी मनपाला देणार आहे. महापालिका आणि कंपनीच्या वादात या सर्व बसेस गेल्या अनेक महिन्यापासून शहराबाहेर पडून आहेत. अनेक बसेसचे टायर्स चोरीला गेले आहेत तर बसेस उभ्या असलेल्या जागेवर झाडं वाढली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close