S M L

उद्या तोडगा नाही तर पुन्हा चर्चा नाही - राजू शेट्टी

0 नोव्हेंबरऊसाचा दर ठरवण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चा फिसकटली. आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुण्यातल्या साखर संकुलात चर्चेची तिसरी फेरी झाली. पण त्यात कोणताच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता पुन्हा उद्या दुपारी दीड वाजता चर्चेची चौथी फेरी होणार आहे.उद्या जर सरकारने तोडगा काढला नाही तर या पुढे चर्चा करणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला ऊसाला कमाल 2250 ते किमान 2200 पर्यंत दर स्वीकारण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टींनी दाखवली होती. त्यामुळे आजची चर्चा सकारात्मक सुरु आहे असं सांगितलं जात होतं. संध्याकाळपर्यंत तोडगा निघण्याचे संकेतही मिळाले होते. पण दरवाढीवर सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं नाही. चर्चेत भाग घेतलेल्या तिन्ही शेतकरी संघटनांनी ऊसाला 2,250 रुपये दराची तयारी दाखवली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे (शरद जोशी गट) अनिल धनवट, शेतकरी संघटनेचे (रघुनाथदादा गट) - रघुनाथदादा पाटील सहभागी होते.तर दुसरीकडे क्रांतीसिंह नाना पाटील यांची मुलगी हौसाताई पाटील यांनीसुद्धा आज राजू शेट्टी यांची भेट घेतली. हौसाताई पाटील यांनीही सरकारवर चांगलीच टीका केली. आमचा अंत बघू नका, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. दरम्यान, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बारामती बंदचं आवाहन केलं आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामतीमध्ये आज आठवडी बाजाराचा दिवस आहे पण तरीही दुकानं बंद आहेत, आणि रस्त्यांवर तुरळक वाहतूक आहे. अजितदादांच्या गावी शिवसेनेचा रास्ता रोकोउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात शिवसेनेनं रास्तारोको केला. तसेच टायर्सची जाळपोळही करण्यात आली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर तालुकाही बंद आहे. तर पुणे सोलापूर हायवेवरच्या गलांडवाडीमध्ये शेतकर्‍यांच्या मुलांनी हर्षवर्धन पाटलांच्या पुतळ्याची होळी केली. तर तालुक्यामध्ये ठिकठिकणी रास्ता रोको आणि चक्का जामही करण्यात येतंय.पुणे-बंगळुरु हायवे ठप्पशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्ग अडवला होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, याच महामार्गावर सांगली जिल्ह्यातही वाघवाडी फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी आंदोलन केली जात आहेत.नाशकात मनसेचा रास्ता रोकोनाशिकमधल्या मनसेच्या तीनही आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक - पुणे हायवेवर रास्ता रोको केला. चेहडी जवळ हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मनसेचे आमदार वसंत गिते यांना अटक करण्यात आली. तर साडेचारशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिकसह निफाड, दिंडोरी अशा 5 ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पंढरपूर आणि माळशिरस इथे शेतकर्‍यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2011 05:47 PM IST

उद्या तोडगा नाही तर पुन्हा चर्चा नाही - राजू शेट्टी

0 नोव्हेंबर

ऊसाचा दर ठरवण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चा फिसकटली. आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुण्यातल्या साखर संकुलात चर्चेची तिसरी फेरी झाली. पण त्यात कोणताच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता पुन्हा उद्या दुपारी दीड वाजता चर्चेची चौथी फेरी होणार आहे.उद्या जर सरकारने तोडगा काढला नाही तर या पुढे चर्चा करणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला

ऊसाला कमाल 2250 ते किमान 2200 पर्यंत दर स्वीकारण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टींनी दाखवली होती. त्यामुळे आजची चर्चा सकारात्मक सुरु आहे असं सांगितलं जात होतं. संध्याकाळपर्यंत तोडगा निघण्याचे संकेतही मिळाले होते. पण दरवाढीवर सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं नाही.

चर्चेत भाग घेतलेल्या तिन्ही शेतकरी संघटनांनी ऊसाला 2,250 रुपये दराची तयारी दाखवली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे (शरद जोशी गट) अनिल धनवट, शेतकरी संघटनेचे (रघुनाथदादा गट) - रघुनाथदादा पाटील सहभागी होते.

तर दुसरीकडे क्रांतीसिंह नाना पाटील यांची मुलगी हौसाताई पाटील यांनीसुद्धा आज राजू शेट्टी यांची भेट घेतली. हौसाताई पाटील यांनीही सरकारवर चांगलीच टीका केली. आमचा अंत बघू नका, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

दरम्यान, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बारामती बंदचं आवाहन केलं आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामतीमध्ये आज आठवडी बाजाराचा दिवस आहे पण तरीही दुकानं बंद आहेत, आणि रस्त्यांवर तुरळक वाहतूक आहे.

अजितदादांच्या गावी शिवसेनेचा रास्ता रोको

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात शिवसेनेनं रास्तारोको केला. तसेच टायर्सची जाळपोळही करण्यात आली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर तालुकाही बंद आहे. तर पुणे सोलापूर हायवेवरच्या गलांडवाडीमध्ये शेतकर्‍यांच्या मुलांनी हर्षवर्धन पाटलांच्या पुतळ्याची होळी केली. तर तालुक्यामध्ये ठिकठिकणी रास्ता रोको आणि चक्का जामही करण्यात येतंय.

पुणे-बंगळुरु हायवे ठप्प

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्ग अडवला होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, याच महामार्गावर सांगली जिल्ह्यातही वाघवाडी फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी आंदोलन केली जात आहेत.नाशकात मनसेचा रास्ता रोको

नाशिकमधल्या मनसेच्या तीनही आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक - पुणे हायवेवर रास्ता रोको केला. चेहडी जवळ हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मनसेचे आमदार वसंत गिते यांना अटक करण्यात आली. तर साडेचारशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिकसह निफाड, दिंडोरी अशा 5 ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पंढरपूर आणि माळशिरस इथे शेतकर्‍यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2011 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close