S M L

आता कापूस उत्पादक शेतक-यांचं आंदोलन

12 नोव्हेंबरऊस उत्पादक शेतक•यांना न्याय मिळालाय, पण विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतक•यांवर मोठा अन्याय होतोय. राज्य सरकारनं या वर्षीसाठी कापसाचा किमान हमी भाव जाहीर केलाय. हा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा जवळपास एक हजार रुपयांनी कमी आहे. एकीकडे महागाई वाढतेय तर दुसरीकडे सरकार कापूस खरेदीचा भाव कमी करतंय.... काय आहे या कापूस उत्पादक शेतक-यांची व्यथा पाहूया..राज्य सरकारनं कापसाला गेल्यावर्षी चार हजार दोनशे पन्नास हा हमीभाव दिला होता. यावर्षी सरकारनं 3300 रुपए हमी भाव जाहीर केलाय. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 950 रुपए कमी हमीभाव सरकार देतंय. खासगी व्यापारी बेचाळीसशे ते 4400 रुपए प्रति क्विंटलच्या दरानं कापूस खरेदी करतायत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला साडे सात हजार रुपए प्रति क्विंटल भाव आहे. पण राज्य सरकारनं फक्त 3300 रुपए प्रति क्विंटल हा भाव दिलाय. एवढंच नाही तर कापसाचं उभं पिक तयार आहे. पण कापूस पणन महासंघानं खरेदी सुरू केलेली नाही. तिकडे सरकारचा हमी भाव जाहीर झाल्यानं खासगी व्यापा•यांनीसुद्धा भाव कमी केलाय. कापूस उत्पादक शेतक•यांना राज्य सरकार 20 टक्के बोनस देत असे... त्यामुळे हमी भाव कमी असूनसुद्धा शेतक•याला थोडा पैसा मिळायचा. पण गेल्या तीन वर्षांपासून सरकारनं बोनससुद्धा बंद केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2011 05:37 PM IST

आता कापूस उत्पादक शेतक-यांचं आंदोलन

12 नोव्हेंबर

ऊस उत्पादक शेतक•यांना न्याय मिळालाय, पण विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतक•यांवर मोठा अन्याय होतोय. राज्य सरकारनं या वर्षीसाठी कापसाचा किमान हमी भाव जाहीर केलाय. हा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा जवळपास एक हजार रुपयांनी कमी आहे. एकीकडे महागाई वाढतेय तर दुसरीकडे सरकार कापूस खरेदीचा भाव कमी करतंय.... काय आहे या कापूस उत्पादक शेतक-यांची व्यथा पाहूया..

राज्य सरकारनं कापसाला गेल्यावर्षी चार हजार दोनशे पन्नास हा हमीभाव दिला होता. यावर्षी सरकारनं 3300 रुपए हमी भाव जाहीर केलाय. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 950 रुपए कमी हमीभाव सरकार देतंय.

खासगी व्यापारी बेचाळीसशे ते 4400 रुपए प्रति क्विंटलच्या दरानं कापूस खरेदी करतायत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला साडे सात हजार रुपए प्रति क्विंटल भाव आहे. पण राज्य सरकारनं फक्त 3300 रुपए प्रति क्विंटल हा भाव दिलाय.

एवढंच नाही तर कापसाचं उभं पिक तयार आहे. पण कापूस पणन महासंघानं खरेदी सुरू केलेली नाही. तिकडे सरकारचा हमी भाव जाहीर झाल्यानं खासगी व्यापा•यांनीसुद्धा भाव कमी केलाय. कापूस उत्पादक शेतक•यांना राज्य सरकार 20 टक्के बोनस देत असे... त्यामुळे हमी भाव कमी असूनसुद्धा शेतक•याला थोडा पैसा मिळायचा. पण गेल्या तीन वर्षांपासून सरकारनं बोनससुद्धा बंद केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2011 05:37 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close